Sangvi Hospital Sonography Issue: सांगवी रुग्णालयात सोनोग्राफीच नाही; गर्भवतींची मोठी गैरसोय

स्त्रीरोग तज्ज्ञांचा अभाव; उपचारांसाठी महिलांना वायसीएमकडे धाव घ्यावी लागते
Sangvi Hospital
Sangvi HospitalPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृह सांगवी रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे सामान्य प्रसूतीसह सिझेरियन ऑपरेशनही होतात. तसेच, शस्त्रक्रिया कक्षाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णालयात सोनोग््रााफीची सुविधाच नाही आणि पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्यामुळे गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Sangvi Hospital
Pimpri Metro DPR Update: मेट्रोसाठी जिजाऊ उड्डाणपूल पाडणार; पिंपरीत चर्चा रंगली

जागेचा अभाव

सांगवी रुग्णालयात रुग्णांचा ओघ सतत सुरू असतो. मात्र, रुग्णालयात सोनोग््रााफीची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना पालिकेचे इतर रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. लोकसंख्येच्या तुलनेत महाालिकेच्या जुनी सांगवी रुग्णालय अपुरे पडत आहे. याठिकाणी दररोज साधारणत: दीडशे ते दोनशे रुग्ण तपासणीसाठी येतात. सांगवी रुग्णालयात जुनी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव आदी परिसरातील नागरिक उपचारासाठी येत असतात. अपुऱ्या जागेमुळे रुग्णांना गर्दीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. सोळा खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त प्रसूती केली जाते. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, ओपीडी, वैद्यकीय अधिकारी आहेत. ओपीडीमध्ये गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर उपचार आणि लसीकरणाची सुविधा आहे.

Sangvi Hospital
Pimpri Chinchwad Property Tax Rebate: ग्रीन बिल्डिंगना मालमत्ताकरात सवलत; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

रुग्णांना नाहक त्रास

रुग्णालयात फक्त प्रसूती केली जाते. त्यामुळे फक्त गरोदर महिलांना दाखल केले जाते. गरोदर महिलांना दर महिन्याला सोनोग््रााफी करावी लागते. मात्र, याठिकाणी सोनोग््रााफी मशीन नसल्याने सोनोग््रााफी होत नाही. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या महिलांना पालिकेच्या इतर रुग्णालयात जावून किंवा खासगी सोनोग््रााफी केंद्रातून सोनोग््रााफी करावी लागते. सोनोग््रााफीसाठी महिलांना औंध जिल्हा रुग्णालय किंवा पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जावे लागते. हे अंतर आणि वेळ यामुळे विशेषतः रात्री-अपरात्री गरोदर महिलांना खूप त्रास होतो. पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने मानधनावरील डॉक्टर बोलावले जाते.

Sangvi Hospital
Pimpri Chinchwad ITR Land: पिंपरी-चिंचवडमध्ये ITR जागा पडून; अतिक्रमणाचा विळखा

आयसीयू, एनआयसीयू नाही

रुग्णालयात फक्त प्रसुती केली जाते. यामध्येदेखील अतिजोखमीच्या गरोदर महिला प्रसूतीसाठी आल्या तर आयसीयूची सुविधा नाही. तर, कधी-कधी जन्मजात बालकाला एनआयसीयूची गरज लागते. अशावेळी वायसीएम किंवा थेरगाव रुग्णालयात पाठविले जाते.

पार्किंगचा अभाव

रुग्णालय बरेच जुने असल्याने त्या वेळी असलेल्या लोकसंख्येचा विचार करून ते बांधण्यात आले होते. त्यानंतर सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सुविधांमध्ये वाढ केलेली नाही. अपुऱ्या जागेमुळे रुग्णांना प्रवेशव्दाराच्या बाहेर रस्त्याच्याकडेला वाहनांचे पार्किंग करावे लागते. लसीकरण मोहीम किंवा इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविताना येथे वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. मुख्य रस्ता असल्याने वाहनांची या रस्त्यावरुन मोठी वर्दळ असते.

Sangvi Hospital
Pune Metro Line 3: हिंजवडीसाठी पुणे मेट्रो 3 ला गती; मे 2026 पर्यंत सेवा सुरू होणार

सोनोग््रााफी मशीन उपलब्ध होईल पण त्यासाठी सोनोग््रााफी तज्ज्ञ उपलब्ध होत नाही. तज्ज्ञ नेमण्यासाठी पाहिजे तेवढी आर्थिक तरतूद नाही. रुग्णालय छोटे असल्याने आयसीयू आणि एनआयसीयू करता येत नाही.

डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

रुग्णालयाची इमारत जुनी असून, जागादेखील अपुरी आहे. नवीन रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

डॉ. तृप्ती सांगळे, रुग्णालयप्रमुख, सांगवी रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news