Pimpri Metro DPR Update: मेट्रोसाठी जिजाऊ उड्डाणपूल पाडणार; पिंपरीत चर्चा रंगली

सुधारित DPR मध्ये 34 स्थानके; भोसरीत वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
Pimpri Bridge
Pimpri BridgePudhari
Published on
Updated on

पिंपरी: निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प ते चाकण मेट्रोच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आराखड्यानुसार भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुधारित आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर राज्य व केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

Pimpri Bridge
Pimpri Chinchwad Property Tax Rebate: ग्रीन बिल्डिंगना मालमत्ताकरात सवलत; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

पूर्वीच्या आराखड्यात 31 मेट्रो स्टेशन होते. या सुधारित आराखड्यात एकूण 34 मेट्रो स्टेशन असणार आहेत. एकूण 47.215 किलोमीटर अंतराचा मार्ग असणार आहे. हा मार्ग भोसरी येथून जाणार आहे. त्यामुळे भोसरी आणि लांडेवाडी येथे मेट्रो स्टेशन असणार आहे. त्या सुधारित डीपीआरनुसार या प्रकल्पास एकूण 12 हजार 937 कोटी 23 लाख खर्च अपेक्षित आहे. पूर्वी प्रकल्पाचा हा खर्च 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये इतका होता.

Pimpri Bridge
Pimpri Chinchwad ITR Land: पिंपरी-चिंचवडमध्ये ITR जागा पडून; अतिक्रमणाचा विळखा

या सुधारित डीपीआर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या मंजुरीनंतर हा आराखडा राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तेथून केंद्राकडून आराखडा पाठवला जाईल. तेथे अंतिम मान्याता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

दरम्यान,महापालिकेने भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपूल बांधला होता. त्यासाठी सुमार 99 कोटी 58 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच, शीतल बाग पाचचारी पुलासाठी 7 कोटी खर्च झाला आहे. हे दोन्ही पूल मेट्रो मार्गासाठी तोडले जाणार आहे. त्यामुळे येथील वाहतूककोंडी सुटणार की वाढणार, असे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news