

पिंपरी: भेंडी गवार, टोमॅटोसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे; तसेच भेंडी, मटाराच्या दरही वाढलेलेच आहेत. ऐन हिवाळयात आवक घटल्याने गत आठवड्यापेक्षा भाज्यांच्या दरात 10 ते 30 रुपये वाढ झाली होती.
पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री मंडईत गाजर, वांगी अधिक प्रमाणात विक्रीस आले आहे. तर, इतर फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. यामध्ये दुधी भोपळा, कोबी, बीट व काकडी या फळभाज्यांची आवक कमी झाली आहे; तसेच गवारची आवकही कमी असल्याने प्रतिकिलो सुमारे 150 रुपयांना विक्री केली जात आहे. मटाराचे दर घसरुन 100 वरून 80 रुपये प्रतिकिलो झाला आहे; मात्र आवक असूनही वांगीच्या दरात पुन्हा 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर देखील 40 ते 50 प्रतिकिलो आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपूच्या दरात वाढ आहे. तर, कोथिंबीरचे दर कमी आहेत.
उपवसानिमित्त रताळयाची आवक
मार्गशीष महिना तसेच, उपवासासाठी रताळ्याची आवक झाली आहे. रताळयाचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलो आहेत. रविवार तसेच संकष्टी चतुर्थीनिमित्त रताळयाची मोठया प्रमाणात विक्री झाली आहे.
मोशीत फळभाज्यांच्या दरात वाढ
मोशी येथील उपबाजार समिती बाजारपेठेत 4 हजार 917 टन फळभाज्यांची आवक झाली आहे. ती गत आवठडयात 4 हजार 809 टन टन आवक झाली होती. दरम्यान, बटाटा, कांदा, फ्लॉवर, काकडी, टोमॅटो याची आवक जास्त होती. तर, गवार, भेंडी, पावटा या भाज्यांची आवक घटल्याने दर शंभरी पार गेले आहेत.
असे आहेत फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)
कांदा : 30, बटाटा : 30 ते 40, लसूण : 100 ते 140, आले : 80 ते 100, भेंडी : 70 ते 80, गवार : 100 ते 120, टोमॅटो : 40 ते 50, मटार : 90, घेवडा : 60, राजमा : 70, दोडका : 50, मिरची : 40, दुधी भोपळा : 50, काकडी : 40, कारली : 60 ते 70, डांगर : 25 ते 30, गाजर : 40 ते 50, पापडी : 70, पडवळ : 80, फ्लॉवर : 60, कोबी : 60, वांगी : 80 ते 90, ढोबळी : 80, बीट : 60, पावटा : 80, वाल : 60, रताळी : 50, चवळी : 60, घोसाळी : 60, कडीपत्ता : 80 ते 100, लिंबू : 30, मका कणीस : 50, सुरण : 60 ते 70, तोंडली : 60.
पालेभाज्यांचे दर (प्रति गड्डी)
कोथिंबीर : 20, मेथी : 30, शेपू : 30, कांदापात : 40, पालक : 20, पुदिना : 10, असे पालेभाज्यांचे प्रति जुडी दर आहेत.