धानोरी : 'भारताला २०४७ पर्यंत विकसित, सुदृढ व बलशाली बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. मागील दहा वर्षांमध्ये फिट इंडिया, खेळी इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाला प्राधान्य दिले जात आहे.
त्यामुळेच धानोरीतील ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा आरोग्य व पर्यावरण यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.
माता जिजाऊ प्रतिष्ठान, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, युवा नेते विशाल टिंगरे आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून रविवारी (दि.७) आयोजन करण्यात आले होते. धानोरी जकातनाका येथून धानोरी ग्रीन मॅरेथॉन सुरू झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मोहोळ बोलत होते. या वेळी आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, अशोक खांदवे, राहुल भंडारे, ऐश्वर्या जाधव, विशाल टिंगरे,
संतोष खांदवे, नितीन भुजबळ, धनंजय जाधव, संदीप मोझे, वंदना खांदवे, सुनीता मोझे, नितीन टिंगरे, पूजा जाधव, लिंगू साखरे, बाबुराव टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, शांताराम खलसे, रावसाहेब राखपसरे, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, जितेंद्र जगताप, सुरेखा राखपसरे, यांसह माता जिजाऊ प्रतिष्ठान, ग्रीन अवनी फाऊंडेशन, लोहगाव रेसिडेंशिअल वेलफेअर असोसिएशन, वन विभाग व कळस, विश्रांतवाडी, धानोरी तसेच लोहगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पार पडली. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. वृक्षारोपणाने स्पर्धेची सांगता करण्यात आली. भविष्यात विश्रांतवाडी, धानोरी व लोहगाव परिसराला आरोग्यदायी व पर्यावरणपूरक बनविण्याचा मानस असल्याचे आयोजक माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी सांगितले.
................
फोटो : 7 Dhanori 1
ओळ : धानोरी ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी झेंडा दाखवून उद्घाटन केले. या वेळी उपस्थित असलेले आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, कार्यकर्ते व सहभागी स्पर्धक.