Pimpri RTO Scrap Vehicles: पिंपरी RTO परिसरात भंगार वाहनांचा ढिग; नागरिकांची गैरसोय

जप्त वाहनांची विल्हेवाट नाही; जागेअभावी आणि अस्वच्छतेमुळे समस्या गंभीर
Scrap Vehicles
Scrap VehiclesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात सध्या बेवारस आणि जप्त केलेल्या वाहनांचा मोठा साठा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने आता पूर्णपणे गंजून भंगारात परिवर्तित झाली असून, संपूर्ण परिसराला अक्षरशः भंगार वाहनांच्या मार्केटचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Scrap Vehicles
Sangvi Hospital Sonography Issue: सांगवी रुग्णालयात सोनोग्राफीच नाही; गर्भवतींची मोठी गैरसोय

या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाच्या या दुर्लक्षावर तीव नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयाच्या परिसरात सर्वत्र उभ्या असलेल्या जुन्या वाहनांमुळे जागेची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच, या वाहनांमुळे परिसरात अस्वच्छता वाढून आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे.

Scrap Vehicles
Pimpri Metro DPR Update: मेट्रोसाठी जिजाऊ उड्डाणपूल पाडणार; पिंपरीत चर्चा रंगली

समस्येची कारणे

नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन ती जप्त केली जातात, परंतु त्यांची पुढील प्रक्रिया वेळेत होत नाही. अनेक वाहने वर्षांनुवर्षे त्याच ठिकाणी पडून असल्याने त्यांची अवस्था भंगारासारखी झाली आहे. नवीन जप्त वाहनांसाठी जागा नसल्याने कार्यालयाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.

Scrap Vehicles
Pimpri Chinchwad Property Tax Rebate: ग्रीन बिल्डिंगना मालमत्ताकरात सवलत; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय

वाहने जप्त होण्याची प्रमुख कारणे

वैध कागदपत्रांचा अभाव, परवाना नियमांचे उल्लंघन, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, अतिवेग व मद्यपान करुन वाहन चालविणे तसेच इतर शासकीय शुल्क न भरत असल्यानेही आरटीओने वाहने जप्त केली आहेत.

Scrap Vehicles
Pimpri Chinchwad ITR Land: पिंपरी-चिंचवडमध्ये ITR जागा पडून; अतिक्रमणाचा विळखा

भंगार वाहनांचा प्रश्न सोडविणे गरजेचे

सध्या पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाची परिस्थिती चिंताजनक बनली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि कार्यालयाच्या सुयोग्य कामकाजासाठी या भंगार वाहनांचा प्रश्न लवकर सोडवणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news