Pimpri Chinchawad Sunny Waghchaure Extortion Threat: ‘गोल्डन मॅन’ सनी नाना वाघचौरे यांना पाच कोटींची खंडणी; जीवे मारण्याची धमकी

लॉरेन्स बिशोई गँगच्या नावाने व्हॉट्सॲपवर धमकी; तपासासाठी चार विशेष पथके सक्रिय
Sunny Waghchaure Extortion Threat
Sunny Waghchaure Extortion ThreatPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरीतील व्यावसायिक आणि सोशल मीडियावर ‌‘गोल्डन मॅन‌’ म्हणून ओळखले जाणारे सनी नाना वाघचौरे यांना पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने चार स्वतंत्र पथके सक्रिय केली आहेत.

Sunny Waghchaure Extortion Threat
Pimpri Chinchwad Civic Challenges: वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडसमोर आव्हानांचा डोंगर

पिंपरीतील नेहरूनगर येथे राहणारे सनी नाना वाघचौरे हे हिंदी सिनेसृष्टीत चित्रपट फायनान्सिंगचे काम करतात. ‌‘कपिल शर्मा शो‌’, ‌‘बिग बॉस 16‌’, ‌‘खतरा खतरा‌’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला असून, सामाजिक व व्यावसायिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात सोने परिधान केल्याने ते ‌‘गोल्डन मॅन‌’ या नावाने ओळखले जातात. दरम्यान, 6 जानेवारी 2026 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती, असा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केला आहे.

Sunny Waghchaure Extortion Threat
Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६ फेब्रुवारीला महापौर निवड

25 जानेवारीला आला होता फोन

वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 जानेवारी रोजी सायंकाळी एका आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या व्हॉट्सॲपवर कॉल आला. त्यानंतर स्वतःला लॉरेन्स बिशोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करत समोरच्या व्यक्तीने संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी, म्हणजे 26 जानेवारी रोजी, आणखी एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर थेट धमकीचा संदेश पाठविण्यात आला. “पाच कोटी रुपये दे; नाहीतर गोळी कुठूनही येऊ शकते. उत्तर दिले नाही तर तुझाही बाबा सिद्दीकी करू,” अशा शब्दांत जीवघेणी धमकी देण्यात आली होती. पाच दिवसांची मुदत देत पैसे न दिल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या संदेशात देण्यात आला आहे.

Sunny Waghchaure Extortion Threat
Pimple Nilakh Linear Garden Misuse: पिंपळे निलखमधील लिनियर गार्डन टवाळखोरांच्या ताब्यात?

पोलिस संरक्षण देण्याची मागणी

या संदेशांमुळे आपण प्रचंड घाबरून गेलो असून, आपल्या जीविताला गंभीर धोका असल्याचे वाघचौरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर त्यांनी थेट पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात धाव घेत तातडीने तक्रार दाखल केली. संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःला आणि कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sunny Waghchaure Extortion Threat
Sunil Shelke Emotional Speech: ‘बापानंतर दादांनीच माझे सगळे हट्ट पुरवले’ — आमदार सुनील शेळके भावूक

आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांचा तांत्रिक तपास

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी चार स्वतंत्र पथके तयार केली आहेत. या पथकांकडून धमकी देण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकांचा तांत्रिक तपास, व्हॉट्सॲप कॉल व संदेशांचे डिजिटल विश्लेषण, आयपी ॲड्रेस व लोकेशन ट्रेसिंग, तसेच या धमकीमागे स्थानिक गुन्हेगारांचा सहभाग आहे का, याचा सखोल शोध घेतला जात आहे. खंडणीच्या गुन्ह्यांबाबत विशेष अनुभव असलेल्या खंडणी विरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

सनी नाना वाघचौरे यांच्या फिर्यादीनुसार संत तुकाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चार स्वतंत्र पथके सक्रिय करण्यात आली आहेत.

शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news