Pimple Nilakh Linear Garden Misuse: पिंपळे निलखमधील लिनियर गार्डन टवाळखोरांच्या ताब्यात?

मद्यपी, असभ्य वर्तनामुळे नागरिक संतप्त; महिला व ज्येष्ठांसाठी सुरक्षिततेचा प्रश्न
Linear Garden Misuse
Linear Garden MisusePudhari
Published on
Updated on

पिंपळे निलख: पिंपळे सौदागरड्ढहिंजवडी रस्त्यालगत महापालिकेच्या वतीने लिनियर गार्डन उभारण्यात आले आहे. तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत विस्तृत पदपथ तसेच पादचारी व नागरिकांना बसण्यासाठी दगडी वटे तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, येथील उद्यान व पदपथाचा वापर टवाळखोर व्यक्ती पार्ट्या करण्यासाठी करत आहेत. यामुळे या उद्यानात येणाऱ्या नागरिक व पादचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Linear Garden Misuse
Sunil Shelke Emotional Speech: ‘बापानंतर दादांनीच माझे सगळे हट्ट पुरवले’ — आमदार सुनील शेळके भावूक

सध्या लिनियर गार्डनमध्ये मद्यपींचा वावर वाढला आहे. यामुळे हे उद्यान नागरिकांसाठी का टवाळखोरांना पार्टी करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. भर दिवसा मद्यपींची बैठक, झाडांखाली पडलेल्या दारूच्या बाटल्या, तसेच वाढदिवसाच्या पार्टीनंतर टाकलेले केकचे बॉक्स व कचरा यामुळे उद्यानाची अवस्था विदारक झाली आहे. सकाळ-संध्याकाळी फिरायला येणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव संतापाची भावना आहे. हे उद्यान आहे की पार्टी हॉल? असा सवाल उपस्थित होत आहे.

Linear Garden Misuse
MHT CET Form Fee Hike: एमएचटी सीईटी फॉर्म फी वाढीने विद्यार्थ्यांमध्ये चिंता

उद्यान परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ, असभ्य वर्तन आणि घाणेरड्या नजरेने पाहण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचा आरोप महिलांनी केला. लहान मुलांना घेऊन आल्यानंतर असुरक्षित वाटते, अशी स्पष्ट भावना एका महिलांनी व्यक्त केली. त्यामुळे अनेक कुटुंबे या उद्यानाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. या भागात पोलिस प्रशासनाचे लक्ष नसल्याने गैरप्रकारांना बळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

Linear Garden Misuse
Lonavala Modified Silencer Action: लोणावळ्यात सायलेन्सर बदलणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची मोठी कारवाई

उद्यानात फक्त सुविधा असून चालणार नाहीत; सुरक्षिततेची हमी हवी. सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित पोलिस गस्त, मद्यपींवर कठोर कारवाई, तसेच स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी.

सुलभा पाटील, स्थानिक महिला

आम्ही त्या ठिकाणी पहाणी करू तसे आढळल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून योग्य ती कारवाई करू. यापुढे नियमित लक्ष दिले जाईल.

संजय शर्मा, लिनियर गार्डन, देखरेख विभाग

Linear Garden Misuse
Pimpri Chinchwad Cleanliness Survey: स्वच्छ सर्वेक्षण 2026 साठी पिंपरी-चिंचवडची जोरदार तयारी

नागरिकांची मागणी

  • मद्यपान व असभ्य वर्तन करणारांवर कारवाई गरजेची आहे.

  • नियमित पोलिस गस्त व सीसीटीव्ही लावावेत.

  • स्वच्छता मोहीम व कचरा करणारांवर दंडात्मक कारवाई

  • कुटुंबे, महिला व ज्येष्ठांसाठी सुरक्षित उद्यान

  • लिनियर गार्डन हे आरोग्य, विरंगुळा आणि सुरक्षिततेचे केंद्र असायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news