Sunil Shelke Emotional Speech: ‘बापानंतर दादांनीच माझे सगळे हट्ट पुरवले’ — आमदार सुनील शेळके भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दादांच्या आठवणींनी वातावरण गहिवरले, नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू
Sunil Shelke Emotional Speech
Sunil Shelke Emotional SpeechPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: माझ्या बापानंतर माझे कोणी हट्ट पुरवले असतील तर ते दादांनी..! असे अभिमानाने सांगत आमदार सुनील शेळके यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दादांनी गेल्या सहा वर्षांत जे मागेल ते दिले, सगळे हट्ट पूर्ण केले, पण आपण दादांना काय दिलं, आपल्या दादांचं दुःख आपण समजू शकलो नाही. याचंच जास्त वाईट वाटतेय, असे शल्य आमदार शेळके यांनी राष्ट्रवादी काँग््रेासच्या बैठकीत व्यक्त केले.

Sunil Shelke Emotional Speech
MHT CET Form Fee Hike: एमएचटी सीईटी फॉर्म फी वाढीने विद्यार्थ्यांमध्ये चिंता

याप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, गणेश ढोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, शंकरराव शेळके, छबुराव कडू, नारायण ठाकर, दीपक हुलावळे, महादू कालेकर, भरत येवले, राजेंद्र सोनवणे, नारायण पाळेकर, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, संतोष

Sunil Shelke Emotional Speech
Lonavala Modified Silencer Action: लोणावळ्यात सायलेन्सर बदलणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची मोठी कारवाई

भेगडे, नारायण भालेराव, सारिका शेळके, सुवर्णा राऊत, अबोली ढोरे, सुनील भोंगाडे, बाळासाहेब भानुसघरे, चंद्रकांत दाभाडे, राज खांडभोर, देवा गायकवाड आदी उपस्थित होते. बबनराव भेगडे यांनी त्यांच्या 40 वर्षातील काही आठवणीना उजाळा दिला. विठ्ठलराव शिंदे म्हणाले, एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून दादांनी जाता जाता माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.

Sunil Shelke Emotional Speech
Pimpri Chinchwad Cleanliness Survey: स्वच्छ सर्वेक्षण 2026 साठी पिंपरी-चिंचवडची जोरदार तयारी

आमदार शेळकेंना जपा : बाफना

दादांचं अकाली जाणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांचा आधार गेला आहे. आमदार सुनील शेळकेंवर जिवापाड प्रेम करणारा माणूस गेल्याने आमदारही पोरके झाले आहेत. त्यामुळे त्यांना जपा असे भावनिक आवाहन करत मावळच्या विकासासाठी सोबत राहण्याचे आश्वासन माजी मंत्री मदन बाफना यांनी या वेळी दिले.

Sunil Shelke Emotional Speech
Pimpri Chinchwad Weather Update: पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ

महिलांसह सगळेच गहिवरले!

याप्रसंगी महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, कल्याणी काजळे यांच्यासह असिफा बागवान या शोकभावना व्यक्त असताना उपस्थित महिलांना रडू कोसळले. तर ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे यांनाही अश्रू अनावर झाले. तसेच बापानंतर दादांनीच हट्ट पुरवले, दादा पत्रावळीमध्ये जेवले अशा आठवणी संघटना आमदार शेळकेही निःशब्द झाले आणि अश्रूंना वाट करून दिली. या भावनिक प्रसंगामुळे सगळेच गहिवरून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news