

पिंपरी: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्याने पिंपरी- चिंचवड शहरातील प्रमुख बाजारपेठ सजली आहे.
भाजपा, शिवसेना, काँग््रेास, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसाठी लागणाऱ्या प्रचार साहित्याने म्हणजेच टी-शर्ट, टोपी, बिल्ले, दुप्पटे, झेंडे इत्यादी साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. या साहित्याच्या खरेदीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी इच्छुकांकडून प्रचारासाठी लागणाऱ्या साहित्यांची मागणी केली जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ- मोठया ऑर्डर मिळतात. त्यामुळे प्रचार साहित्याला मागणी वाढते. तसेच प्रत्येक प्रभागात स्वतंत्र उमेदवार, स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार आणि मोठया प्रमाणावर प्रत्यक्ष जनसंपर्क मोहिम राबविल्या जात असल्याने प्रचार साहित्याला मोठी मागणी वाढली आहे.
साहित्याचे दर
टी-शर्ट: 150 ते 200
टोपी: 50 ते 100
बिल्ले: 50 ते 100
झेंडे: 100 ते 300
फलक: 250 ते 300
सभा पदयात्रा साहित्य सेट: 5000 ते 10000 हजार रुपये
अलीकडच्या काळात उमेदवार पोस्टर, बॅनर कमी आणि सोशल मीडियावर लक्ष देतात; तरीदेखील पारंपरिक प्रचार साहित्यालाही मोठी मागणी आहे. पक्षांच्या झेंड्यांना विशेष मागणी आहे.
जय भाटिया, व्यापारी