Pimpri Chinchwad Standing Committee: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत कोट्यवधींच्या खर्चांना मंजुरी; वाकड बस डेपोसाठी ३.३१ कोटी

महिला वसतिगृहासाठी २९.१४ कोटी; दिव्यांग, शिक्षण, पशुवैद्यकीय सेवा आणि नागरी सुविधांसाठीही निधीला मान्यता
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाकड येथील जागेत पीएमपीएल बस डेपो विकसित करण्यात येत आहे. तेथील चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठ्यासाठी जोड घेण्यासाठी महावितरण कंपनीचे 3 कोटी 31 लाख 11 हजार रुपये शुल्क अदा करण्यासह विविध कामांच्या खर्चाना स्थायी समितीने बुधवारी (दि.16) झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dapodi Ganesh Immersion: ‘दापोडीत बाप्पाच्या विसर्जनाची वाट बिकट’ वृत्ताची दखल; विसर्जन हौदांवर प्लास्टिकच्या टाक्या

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. महापालिकेकडून वाकड येथील पीएमपीएल बस डेपोत चार्जिंग स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. तेथे वीजपुरवठा करण्यासाठी 3 कोटी 31 लाख रुपये शुल्क अदा करण्यात येणार आहे. वाकड येथे महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी 29 कोटी 14 लाख 33 हजार 849 रुपये खर्च आहे. त्यासाठी चालू आर्थिक वर्षातील जमा व खर्च लेखाशीर्षामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad RTO Action: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांवर आरटीओचा दणका; ३९५ प्रकरणांत ८.०९ लाखांचा दंड

क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला बचत गटाच्या माध्यमातून शून्य कचरा प्रकल्प राबविण्यास 7 लाख 27 हजार रुपये खर्चासह मुदतवाढ देणे. शिक्षण मंडळ विभागाच्या प्राथमिक शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्त्वावर देखभाल व दुरुस्तीसाठी 42 लाख 37 हजार रुपये खर्च आहे. दिव्यांग व्यक्तींना मोफत बसप्रवास पास देणे. साठ वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना बस प्रवासाचा मोफत पास देण्याच्या योजनेअंतर्गत महापालिकेने एकूण 3 हजार 29 जणांना पास दिले आहे. त्यावर 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या एका आर्थिक वर्षांत एकूर 5 कोटी 32 लाख 40 हजार 746 रुपये खर्च झाला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख; १५ दिवसांत ३८ रुग्ण पॉझिटिव्ह

महापालिकेच्या विविध पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये, अ‍ॅम्ब्युलन्सवर, डॉग व्हॅन आणि डॉग पार्क आदी ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ दोन वर्षे पुरवण्यासाठी दोन वेगवेगळ्या एजन्सीवर एकूण 10 कोटी 75 लाख 36 हजार 422 रुपये खर्च आहे. महापालिकेच्या विविध विभागांचे दैनंदिन कामकाज तसेच, सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी मतदार याद्या व इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याच्या कामासाठी 24 लाख 64 हजार रुपये खर्च आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत शहरात मूलभूत नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपये अनुदानातून शाळांमध्ये प्रयोगशाळा व वाचनालय विकसित करणे, जीमचे उपकरणे बसविणे आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 20 बालवाडी शिक्षिकांना दरमहा 10 हजार रुपये अनुदान दिले जाते. अकरा महिन्यांसाठी 22 लाख खर्च आहे. यासह विविध खर्चांना समितीने मान्यता दिली.

दिव्यांग भवन फाउंडेशन संचालक मंडळात महापौर, पदाधिकारी

मोरवाडी, पिंपरी येथे दिव्यांग भवन फाउंडेशन कंपनीच्या संचालनाचे अध्यक्ष आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे आहेत. त्या मंडळात संचालक म्हणून महापौर रवी लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचा संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, समाज विकास विभागाचे उपायुक्त ममता शिंदे, दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. दिव्यांग भवन फाउंडेशनची स्थापना कंपनी कायद्यानुसार 1 फेब्रुवारी 2024 करण्यात आली आहे. भवनचे उद्घाटन तत्कालिन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2024 ला करण्यात आले. एकूण 24 हजार चौरस फूट बांधकाम असलेल्या दिव्याग भवन इमारतीमध्ये सर्व 21 प्रकारच्या दिव्यांगांना 17 हून अधिक उपचार प्रदान केले जातात. आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Complaint Box: पिंपरी-चिंचवडमधील शाळांतील ‘तक्रार पेटी’ला कुलूप; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सवाल

फांद्या स्मशानभूमीत देणार

शहरातील झाडांच्या धोकादायक फांद्या उद्यान विभागाकडून छाटल्या जातात. ते काम झाल्यानंतर त्या फांदा रस्त्यावर टाकून दिल्या जातात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. त्या फांद्या व लाकडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात यावेत. त्यामुळे लाकडांचा चांगला वापर होईल, अशा सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी उद्यान विभागास दिल्या आहेत.

थेट पद्धतीने कलादालन नाममात्र भाडे तत्त्वावर

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील 1 हजार स्केअर फूट आकाराचे कलादालन निविदा न काढता थेट पद्धतीने एका संस्थेला भाडे तत्त्वावर देण्यात आले आहे. प्रेक्षागृहातील पहिल्या मजल्यावरील हे कलादालन वर्षाला 75 हजार रुपये नाममात्र भाडे आकारण्यात येणार आहे. क्रीडा समितीच्या त्या ठरावाला स्थायी समिनीने मान्यता दिली आहे. कलादालन प्रदर्शनासाठी देण्यास भाडे अल्पदरातील भाडे शुल्क ठरवण्यात यावे. त्याबाबत धोरण तयार करावे, अशी उपसूचना त्या प्रस्तावाला देण्यात आली असल्याचे समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news