Pimpri Chinchwad RTO Action: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांवर आरटीओचा दणका; ३९५ प्रकरणांत ८.०९ लाखांचा दंड

फॅन्सी नंबर प्लेट, काळी फिल्म, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई; परराज्यातील ४५ लक्झरी बसही रडारवर
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on
Updated on

पिंपरी: वाहनांवर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट, काळी फिल्म, एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नसणे तसेच इतर राज्यांत नोंदणी असलेल्या दोषी लक्झरी बसविरोधात पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विशेष तपासणी मोहीम राबविली. १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३९५ प्रकरणांत कारवाई करत एकूण ८ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Dengue Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा डंख; १५ दिवसांत ३८ रुग्ण पॉझिटिव्ह

या विशेष मोहिमेदरम्यान आरटीओच्या पथकांनी विविध प्रकारच्या वाहनांची तपासणी केली. वाहनांच्या काचांना नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली काळी फिल्म, आकर्षक अथवा नियमबाह्य नंबर प्लेट, चुकीच्या पद्धतीने लिहिलेले नोंदणी क्रमांक तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याशिवाय इतर राज्यांत नोंदणी असलेल्या लक्झरी आणि ट्रॅव्हल्स बसचीही तपासणी करण्यात आली.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Complaint Box: पिंपरी-चिंचवडमधील शाळांतील ‘तक्रार पेटी’ला कुलूप; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सवाल

मोहिमेत काळी फिल्म लावलेल्या १६ वाहनांवर कारवाई करून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या २७५ वाहनांवर कारवाई करत १ लाख ८ हजार रुपये, फॅन्सी नंबर प्लेट तसेच चुकीच्या पद्धतीचे नोंदणी क्रमांक असलेल्या ५९ वाहनांवर कारवाई करून २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Gauri Festival: गौराईच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; मुखवटे, दागिने अन् पूजासाहित्याची खरेदी

याशिवाय इतर राज्यांत नोंदणी असलेल्या ४५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ६ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ३९५ प्रकरणांमध्ये ८ लाख ९ हजार रुपयांचा दंड शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

Pimpri Chinchwad RTO
PCMC Employees Promotions: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर पदोन्नत्या; अधिकाऱ्यांच्या बदल्यांनाही आयुक्तांची मंजुरी

वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे

वाहनमालकांनी वाहनांवरील नियमबाह्य किंवा फॅन्सी नंबर प्लेट तात्काळ काढून शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. वाहनांच्या काचांना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने काळी फिल्म लावू नये. तसेच, वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करून वाहनाची मूळ रचना अथवा सुरक्षा मानकांमध्ये बदल करू नये. नियमांचे उल्लंघन आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरटीओने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news