Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभाग फुटल्यामुळे राजकीय समीकरण बदलले; एससी-एसटी आरक्षण जाहीर

128 जागांपैकी 20 एससी व 3 एसटीसाठी राखीव; निवडणूक पूर्व रणनिती जोरावर सुरू
Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभाग फुटल्यामुळे राजकीय समीकरण बदललेPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी चार सदस्यीय 32 प्रभागरचना अंतिम झाली आहे. त्यानंतर आरक्षण सोडत कधी निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्रभागातील अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकसंख्येवरून त्या वर्गासाठी राखीव असलेल्या एकूण 23 जागा कोणत्या प्रभागात असणार हे स्पष्ट झाले आहे. त्यावरून राजकीय गणिते निश्चित केली जात आहेत.(Latest Pimpri chinchwad News)

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Pune News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस खड्ड्यात, कडूस-कोहिंडे रस्त्यावरील प्रवास असुरक्षित

प्रभागरचना सोमवारी (दि.6) अंतिम झाली आहे. केवळ सहा प्रभागात बदल झाले असून, उर्वरित 26 प्रभाग पूर्वीप्रमाणेच आहेत. असे असले तरी, सहा प्रभागातील लोकसंख्या बदलल्याने प्रभागातील एससी आणि एसटी आरक्षणात बदल झाले आहेत. एससी व एसटीची लोकसंख्या वाढल्याने त्या प्रभागात एसटी व एससीचे आरक्षण पडू शकते. हक्काच्या जागेवर आरक्षण पडणार असल्याने खुल्या गटातील तसेच, ओबीसी गटातील उमेदवारांनी आजूबाजूच्या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. तसेच, कुटुंबातील महिला सदस्याला निवडणूक उतरविण्याचा पर्याय समोर आणला आहे.

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Pimpri Chinchwad municipal election 2025: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभागरचना जाहीर: SC/ST बदलामुळे राजकीय समीकरणात हलचाल

दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रभागातील चित्र अधिक सुस्पष्ट होणार आहे. त्यानंतर पुढील रणनिती ठरविण्याचा निर्णय माजी नगरसेवकांसह, पदाधिकारी व इच्छुकांनी घेतला आहे. काठावर असलेले इच्छुक त्यानंतरच कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढायचे हे ठरविणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Vadgaon Maval Talegaon municipal election 2025: आरक्षण सोडतीत कही खुशी, कही गम !

असे आहे 128 जागेवरील आरक्षण

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार)

एकूण लोकसंख्या-17 लाख 27 हजार 692

एससी लोकसंख्या- 2 लाख 73 हजार 820

एसटी लोकसंख्या-36 हजार 535

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Pune municipal hospitals pediatric ICU crisis: बालरुग्णांना ससूनवर अवलंबून का? महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर नाहीत!

आरक्षण सोडतीसाठी पालिका तयार

राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्याबाबत जाहीर झाल्यानंतर त्यानुसार आरक्षण सोडत घेतली जाईल. त्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने तयारी करून ठेवली आहे, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

असे आहे 128 जागेवरील आरक्षण

अनुसूचित जाती (एससी) 20

अनुसूचित जमाती (एसटी) 3

इतर मागास वर्ग (ओबीसी) 35

सर्वसाधारण महिला (ओपन) 35

सर्वसाधारण (ओपन) 35

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Pune municipal election 2025 voter list update: 14 क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी, मतदार यादी विभाजनाला वेग

‌‘एससी‌’साठी या 20 प्रभागांत असू शकेल आरक्षण

एससी प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 19, 13, 30, 25, 23, 20, 9, 11, 16, 21, 10, 32, 29, 27, 31, 26, 8, 4, 17 आणि 3 हे एकूण 20 प्रभागात आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहेत. एससी लोकसंख्येनुसार या प्रभागातील एका जागेवर महिला किंवा पुरूष एससी प्रवर्गाचे आरक्षण पडू शकेल. या 20 पैकी 10 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Ration card verification Maharashtra 2025: दुबार आणि संशयास्पद शिधापत्रिका रडारवर! 'मिशन सुधार'मुळे अनेकांना गंडांतर

‌‘एसटी‌’साठी आरक्षण असलेले हे तीन प्रभाग

प्रभाग क्रमांक 4, 29 आणि 30 या तीन प्रभागांत एसटी प्रवर्गाचे आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे. त्यातील दोन जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या प्रवर्गात पुरुषासाठी केवळ एक जागा राखीव असणार आहे. या तीन प्रभागांत एससीसाठी एक जागा राखीव असू शकते. त्यामुळे या तीन प्रभागांतील उर्वरित दोन जागा खुल्या किंवा ओबीसी प्रवर्गासाठी असू शकतील.

Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025
Vanjari community ST reservation demand: वंजारी समाजाचा बोधेगावमध्ये रास्ता रोको आंदोलन; एसटी आरक्षणासाठी आवाज उठवला

दिवाळीनंतर आरक्षणाचा धमाका ?

राज्यातील जिल्हा परिषदेसह नगरपरिषद, नगरपंचायतीची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच महापालिकेची एकाच वेळी आरक्षण सोडत काढली जाईल. त्यामुळे दिवाळीनंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news