Vadgaon Maval Talegaon municipal election 2025: आरक्षण सोडतीत कही खुशी, कही गम !

महिला नगराध्यक्ष होणार वडगावची कारभारी; नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित
Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Vadgaon Maval Talegaon municipal election 2025Pudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला या जागेसाठी आरक्षित झाले असल्याने वडगाव शहराची नवी कारभारी एक महिला होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता फक्त ही कारभारी कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Pimpri Chinchwad municipal election 2025: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभागरचना जाहीर: SC/ST बदलामुळे राजकीय समीकरणात हलचाल

आज मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील नगर परिषद, नगरपालिका व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये वडगाव मावळ नगरपंचायतचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित झाले आहे. वास्तविक याआधी काही वर्षांपूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीमध्येही नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठीच आरक्षित झाले होते. नव्याने काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीमध्ये काहीसा बदल होईल, अशी अपेक्षा वाटत होती; परंतु पुन्हा तेच आरक्षण आल्याने गेली दोन-तीन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्यादृष्टीने हिताचे ठरले आहे.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Pune News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस खड्ड्यात, कडूस-कोहिंडे रस्त्यावरील प्रवास असुरक्षित

वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक सन 2018 मध्ये झाली होती. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे भास्करराव म्हाळसकर, अपक्ष मयूर ढोरे व अपक्ष पंढरीनाथ ढोरे अशी तिरंगी व चुरशीची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मयूर ढोरे यांनी विजय मिळवला होता. दरम्यान, पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे असणारे मयूर ढोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, नगरसेवक पदाच्या एकूण 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 7, भारतीय जनता पार्टीचे 7, दोन अपक्ष व 1 मनसे असे पक्षीय बलाबल झाले होते. सुरुवातीला राष्ट्रवादीचा एक गट व भाजप अशी सत्ता स्थापन करण्यात आली होती, परंतु सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी विजय मिळवल्यानंतर नगरपंचायतमधील सत्तेतही बदल झाला आणि नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
PCMC Diwali Bonus 2025: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 62 कोटींचा दिवाळी बोनस

दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट

आता नगरपंचायतचा कार्यकाळ संपून दोन वर्षे झाली असून, सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत निवडणूक होऊन नवीन कारभारी निवडले जाणार आहेत. दरम्यान, त्यादृष्टीने गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रामुख्याने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक महिला उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन तसेच एक मनसेच्या उमेदवाराचा समावेश आहे. भाजपचा मात्र अद्याप एकही उमेदवार चर्चेत आलेला नाही. त्यामुळे भाजप अजूनही वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचे दिसते.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Dehuroad cow rescue: शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीची सुटका

महायुतीवर ठरणार नगराध्यक्ष पदाची लढत

दरम्यान, नगरपंचायत निवडणुकीत महायुती होणार की नाही यावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे ठरणार आहे. महायुती झाली तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तसेच, महायुती नाही झाली तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष किंवा महाविकास आघाडी अशी तिरंगी लढतीची शक्यता आहे.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Marathwada floods impact labour: घर वाचवावं की, भाकरीमागं पळावं..!

उद्या होणार प्रभागनिहाय आरक्षण सोडत

नगरपंचायतची निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून, शहरात 17 प्रभाग आहेत. त्यामुळे नगरसेवक पदांची संख्या 17 आहे. या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे, यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला या जागांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता नगरपंचायत सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार असून गुरुवारी (दि. 9) प्रसिद्धी होणार आहे. 9 ते 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना घेण्यासाठी मुदत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी सांगितले.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Kudluwadi road development: कुदळवाडी रस्त्यांचा खर्च 26 कोटींनी वाढला; ठेकेदारांना काम निविदा न काढता बहाल

तळेगावात नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. 7) जाहीर झाले असून, सर्वसाधारण खुल्या (ओपन) प्रवर्गासाठी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मावळ तालुक्यातील सर्वांधिक मतदार असलेल्या या नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील पक्षीय इच्छुक उमेदवारांची नगराध्यक्षपदाच्या तिकीटावर वर्णी लागावी यासाठी यंदा जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्याची राजकीय राजधानी असल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रस्थापितांच्या राजकीय अस्तित्वाची असणार आहे.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Pimpri cyber fraud crackdown: सायबर पोलिसांच्या कारवाईमुळे फसवणुकीत 30 कोटींची घट

कोअर कमिटीपुढे तिकीट वाटपाची होणार डोकेदुखी

सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्षपदाच्या प्रवर्ग आरक्षणाची सोडत जाहीर केली. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी खुल्या गटातील (सर्वसाधारण खुला प्रवर्ग) आरक्षण निश्चिती झाली. विद्यमान आमदार, माजी आमदार आणि विधानसभेच्या निवडणुका लढविलेले स्थानिक उमेदवार नेते याच शहरातील असल्याने डिसेंबर अखेर होणाऱ्या या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधातील गटांमध्ये टोकाची स्पर्धा होणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे निरीक्षण आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांनी स्थापित केलेल्या कोअर कमिटीपुढे तिकीट वाटप ही सर्वांत मोठी डोकेदुखी असणार आहे.

Vadgaon Maval Talegaon municipal election 2025
Vegetable prices pune market: आवक घटली, पालेभाज्यांचे दर वधारले! कोबी-फ्लॉवर मात्र स्वस्त

युती, महाआघाडी आणि एकला चलो रे

मावळ तालुका विधानसभेच्या गेल्या दोन्ही निवडणुकांमुळे तालुक्यातील पक्षीय राजकारणाची प्रस्थापित समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. राज्यातील युतीचा फॉर्म्युला नगर परिषद निवडणुकीत कायम राहणार की अखेर पुन्हा बंडखोरी होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम कायम आहे. नगराध्यक्षपदासाठीही आजी माजी स्थानिक नगरसेवकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, युती, महाआघाडीचा धर्म पाळताना तिकीटावर वर्णी लागली नाही तर एकला चलो रे चा नारा देण्याच्या तयारीने काहीजणांनी फिल्डिंग लावली आहे. निवडणुकीतील राजकारणाचे अनेक डावपेच यंदाच्या निवडणुकीत खेळले जाणार असून, आचारसंहिता लागू होताच ते समोर येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news