Pune municipal election 2025 voter list update: 14 क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी, मतदार यादी विभाजनाला वेग

प्रभागनिहाय यादी अद्ययावत करण्याचे आदेश; महापालिकेच्या निवडणूक तयारीला औपचारिक सुरुवात
Pune Municipal Election 2025
14 क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी, मतदार यादी विभाजनाला वेगPudhari
Published on
Updated on

पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीसाठी मतदार यादी विभाजनाचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने 14 क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी सोपवली आहे. या कार्यालयांमार्फत विधानसभा मतदार यादीचे विभाजन करण्याचे आदेश जारी केले आहेत. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीसाठी मतदार यादी विभाजनाचे काम वेगाने सुरू झाले आहे.(Latest Pune News)

Pune Municipal Election 2025
Pune municipal hospitals pediatric ICU crisis: बालरुग्णांना ससूनवर अवलंबून का? महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर नाहीत!

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील उपलब्ध अभियांत्रिकी, आरोग्य निरीक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार यादी विभाजनाच्या कामात नेमणूक केली आहे.

Pune Municipal Election 2025
Leopard attack Ambi village Pune: म्हशीच्या आक्रमकतेपुढे बिबट्याची माघार! पारडाचा जीव थोडक्यात वाचला

येरवडा- धनोरी-कळस, नगर रोड-वडगाव शेरी, शिवाजीनगर-घोले रोड, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, धनकवडी-सहकारनगर, भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड आदी 14 क्षेत्रीय कार्यालयांचा यात समावेश असून, या कार्यालयांना संबंधित विधानसभा क्षेत्रानुसार प्रभाग क्रमांक निश्चित करून दिले आहेत. या आदेशामुळे महापालिकेतील निवडणूक तयारीला औपचारिक सुरुवात झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करून येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

Pune Municipal Election 2025
OLX mobile theft racket Pune: चोरलेल्या मोबाईलची ‌‘OLX’वर विक्री

निवडणूक कामासाठी अधिकाऱ्यांना आदेश

निवडणूक कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांमधील उपलब्ध अभियांत्रिकी शाखाधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि इतर विभागीय कर्मचारी यांना तत्काळ कार्यरत होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक कार्यालयाने यासंबंधी आदेशाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करावी, असेही आदेशात नमूद आहे.

Pune Municipal Election 2025
Crime Petrol inspired fugitive Pune‌: ‘क्राइम पेट्रोल‌’ पाहून पोलिसांना चकवा देणारा गुन्हेगार पकडला

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विभाजनाचे काम पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पाडले जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी तातडीने काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news