PCMC Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 27 व्या महापौरपदाची आज निवड

महापौरपदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज; उपमहापौरपदासाठी चुरस संभवते
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 27 व्या महापौरपदाची निवड शुक्रवारी (दि.6) सकाळी अकराला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड होईल. ते 27 वे उपमहापौर असणार आहेत. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानंतर महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू होणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Chinchwad Aadhaar Centre: चिंचवड पोस्ट कार्यालयातील आधार केंद्र बंद; नागरिकांची मोठी गैरसोय

महापौर पदासाठी भाजपाकडून नगरसेवक रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आला आहे तर, उपमहापौर पदासाठी भाजपाच्या नगरसेविका शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या (अजित पवार) नगरसेविका वैशाली काळभोर यांचा अर्ज आहे. पुण्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनातील तळमजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकराला ती विशेष सभा होणार आहे. प्रथम महापौर पदाची निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उपमहापौर पदाची निवडप्रक्रिया होईल.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dapodi Illegal Truck Transport: दापोडीत विनापरवाना ट्रक धावला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

राष्ट्रवादी काँग््रेासने अर्ज मागे घेतल्यास उपमहापौर पदाची निवडीही बिनबिरोध होईल. अन्यथा मतदानप्रकिया पार पडेल, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले. महापालिकेच्या या पहिल्या सभेसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह स्वच्छ करून नीटनेटके करण्यात आले आहे. तसेच, तिसऱ्या मजल्यावरील महापौर व उपमहापौराचे दालनही नीटनेटके करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Pune Metro Line 3: हिंजवडी मेट्रो अजून प्रतीक्षेत; 93% काम पूर्ण तरीही उशीर

सर्व नगरसेवक पहिल्यांदा येणार सभागृहात

महापालिका निवडणुकीत विजयी झालेले सर्व 128 नगरसेवक उद्याच्या विशेष सर्वसाधारण सभेला हजर राहणार आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकाचे पाऊल महापालिकेत तसेच, सभागृहात पडणार आहे. सभागृहातील पहिला दिवस असल्याने अनेक नगरसेवक व नगरसेविका आकर्षक पेहराव करणार आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Water Supply: भामा-आसखेड रखडला; पिंपरी-चिंचवडकरांना अजून वर्षभर पाणीटंचाई

अजितदादांच्या निधनामुळे जल्लोष नसेल

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडीनंतर जल्लोष केला जाणार नाही. गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण तसेच, फटाके फोडले जाणार नाहीत. आनंदाची मर्यादा राखली जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news