Pimpri Chinchwad Pune Metro Line 3: हिंजवडी मेट्रो अजून प्रतीक्षेत; 93% काम पूर्ण तरीही उशीर

23 स्थानकांची चाचणी सुरू, 13 स्थानकांचे काम अपूर्ण; आयटीन्सची वाढती प्रतीक्षा
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पुणे ते पिंपरी-चिंचवडला जोडल्यानंतर आता हिंजवडीला जोडण्यासाठी पुणे मेट्रो 3 प्रतीक्षेत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. यापूर्वी 18 स्थानकांची चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता संपूर्ण 23 स्थानकांची चाचणी या महिन्यात पूर्ण करण्यात येईल. तत्पूर्वी सिग्नल यंत्रणा, इलेक्ट्रीक कामे आणि महत्त्वाचे म्हणजे 13 स्थानकांचे काम अपूर्ण असल्याने मेट्रोला धावण्यास उशीर होत आहे.

Pune Metro
Pimpri Chinchwad Water Supply: भामा-आसखेड रखडला; पिंपरी-चिंचवडकरांना अजून वर्षभर पाणीटंचाई

हिंजवडी, आयटीन्सची प्रतीक्षा असलेली बहुचर्चित मेट्रोचे काम डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण करा, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यातच आता मेट्रोला दिलेली दुसरी वाढीव सवलतदेखील मार्च 2025 मध्ये संपत आहे. वेगवेगळया कारणांनी व जागा ताब्यात नसल्याचे कारण सांगून मेट्रो विकसित करणारया ठेकेदाराने मुदत वाढवून मागितली होती. त्यामुळे आता केवळ दोन महिने बाकी असून, अद्याप एकही स्टेशन पूर्ण नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Metro
PCMC Mayor Election: पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान

दरम्यान, माण डेपो ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक या जवळपास 18 स्थानकांपर्यंत चाचणी नुकतीच पूर्ण केली. तर, शिवाजीनगर स्थानकापर्यंत अद्याप चाचणी झालेली नाही. ती या महिन्यात (फेब्रवारी)मध्ये घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर पुण्यातील तिसरा मेट्रोचा मार्ग प्रवाशांसाठी ख्ुाला होणार आहे. तत्पूर्वी स्थानकांचे काम मागे राहिल्याने नेमके किती स्थानके खुले करतील, हे अद्याप पीएमआरडीएने स्पष्ट केले नाही.

Pune Metro
Maval ZP PS Election: मावळ तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान; 243 केंद्रांवर 2.31 लाख मतदार

माण ते शिवाजीनगर हे 23 किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम सुरू झाले आहे. सिव्हील काम म्हणजेच स्ट्रक्चर आणि रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची विविध चाचण्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. केंद्राच्या पथकाने त्याची तपासणीदेखील केली. हिंजवडी ते बाणेर या टप्प्यापर्यंत चाचणी झाल्यानंतर पहिल्यांदाच विद्यापीठ चौकापर्यंत म्हणजेच 19 किलोमीटरची चाचणी झाली. त्यातील काही दोष, दुरुस्त्या दूर करण्याचे काम सुरू आहे. आता शेवटपर्यंत म्हणजेच 23 किलोमीटर मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे.

Pune Metro
Chikhli Reserved Plot Misuse: चिखलीतील आरक्षित भूखंडाचा गैरवापर; महापालिकेने कचऱ्याचे डेपो केले मैदान

आयटीन्सची प्रतीक्षा

मेट्रो प्रकल्पाचा मुख्य अडसर असलेला पुण्यातील दुमजली पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या सर्वांत वरच्या स्तरावर मेट्रो धावेल. यानंतर मेट्रो सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. या मार्गामुळे केवळ हिंजवडीच नव्हे, तर बाणेर, पाषाण, विद्यापीठ, औध या सर्वच ठिकाणांची होणारी कोंडी काही अंशी कमी होईल. सर्वांधिक आयटीन्स या मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत.

8 स्थानके पूर्णत्वाकडे

माण डेपोपासून ते शिवाजीनगर यातील 23 स्थानकांपैकी 8 स्थानके जवळपास पूर्ण झाली आहेत. तर, 15 स्थानकांचे काम सुुरू आहे. त्यामुळे मार्च महिन्यात मेट्रोला सिग्नल मिळाल्यास त्यापैकी काही स्थानके सुरू करण्याचा विचार आहे. कारण, 13 स्थानकांचे काम हे मार्चअखेरपर्यंत होणे अवघड असल्याने पहिल्या टप्प्यात काही स्थानके सुरू करण्याच्या विचाराधीन आहे.

मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेळोवेळी कामाचा आढावादेखील घेत आहोत. 23 स्थानकापर्यंत ट्रायल या महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर सिग्नल व इतर कामे झाल्यानंतर मेट्रो सुरू होईल. 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.

रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news