Dapodi Illegal Truck Transport: दापोडीत विनापरवाना ट्रक धावला; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पुणे–मुंबई जुन्या महामार्गावर संशयास्पद ट्रक अडवला; परवाना संपलेला, क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहतूक
Illegal Truck Transport
Illegal Truck TransportPudhari
Published on
Updated on

दापोडी: पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर दापोडी येथे विनापरवाना ट्रक संशयास्पद स्थितीत धावताना आढळून आला. हा ट्रक रिकाम्या टाक्या घेऊन महामार्गावर प्रवास करत होता; परंतु नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्यांनी ट्रक अडवून पोलिस प्रशासनाला माहिती दिली. यामुळे अनर्थ टळण्यास मदत झाली आहे.

Illegal Truck Transport
Pimpri Chinchwad Pune Metro Line 3: हिंजवडी मेट्रो अजून प्रतीक्षेत; 93% काम पूर्ण तरीही उशीर

या वेळी अतुल पवार यांनी सदर वाहन (एम एच 13 ए एक्स 4786) थांबवून वाहनचालकाची चौकशी केली. वाहनचालकाने सांगितले की, तो मुंबईहून सोलापूरकडे जात आहे. मात्र वाहनचालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे विचारल्यावर वाहनचालकाने स्पष्ट केले की वाहन परवाना संपलेला आहे. तसेच ‌‘गाडीचा परवाना ऑनलाइन चेक करा‌’ असे उत्तर दिले. त्यामुळे वाहन अनधिकृत पद्धतीने वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

Illegal Truck Transport
Pimpri Chinchwad Water Supply: भामा-आसखेड रखडला; पिंपरी-चिंचवडकरांना अजून वर्षभर पाणीटंचाई

या गंभीर बाबीची दखल घेत 112 वर कॉल करून संबंधित विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत योग्य ती कार्यवाही केली. अशा पद्धतीने परवाना संपलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे संबंधित प्रशासनाने आशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे सदर ट्रक क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहत असल्याने एका बाजूला कललेला होता. तरीही चालक वेगाने व बेधुंदपणे वाहन चालवत होता. हे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारच्या वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना वाहतूक पोलिसांनी कराव्यात, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news