Pune Metro Phase 3 Delay: पुणे मेट्रो तिसरा टप्पा रखडला; सर्व स्टेशन एकत्र सुरू करण्यावरून अडथळे

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाला विलंब; 23 किमी चाचणी पूर्ण तरीही प्रवाशांची प्रतीक्षा कायम
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुणे मेट्रोचा 3 टप्पा अर्थात माण डेपो ते शिवाजीनगर मार्ग हा पुढील दोन महिन्यांत खुला होणार आहे. मात्र, त्यासाठी सर्वच स्टेशन सुरू करण्याचा अट्टहास संचालित असलेल्या खासगी कंपनीकडून केला जात आहे. त्यामुळे आधीच उशिर झालेली मेट्रो रुळावर आणण्यासाठी आता 13 स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ढकल स्टार्ट मेट्रो नकोच, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तर, मेट्रो प्रशासनाने मार्च अखेरीस काम पूर्ण करण्याचे पत्र दिले आहे.

Pune Metro
Sunetra Pawar Farmers Meeting: काटेवाडीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी भेट; तातडीच्या मदतीचे आश्वासन

मेट्रो 3 टप्पा हा मार्ग एप्रिल 2026 अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये जाणार्या हजारो कर्मचार्यांचा प्रवास वेगवान आणि सुलभ होणार आहे. त्यातच लाखो आयटी कर्मचार्यांकडून ही मेट्रो बाणेरपर्यंत अथवा जेवढे स्थानक सुरू करण्यास उपलब्ध आहेत, तेथून सुरू करावी, अशी मागणी होती. तत्कालीन आयुक्त योगेश म्हसे यांनी हा मेट्रो टप्प्पा एप्रिल अथवा मेमध्ये सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर पीपीपी तत्वावर कंत्राटी कंपन्यांकडून मात्र अशी अपूर्ण व अर्धवट मेट्रो चालविण्यास नकार दिला जात आहे.

Pune Metro
Gudi Padwa Vehicle Sell: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला उधाण; शहरात 10 हजारांहून अधिक नोंदी

23 किमीची चाचणी पूर्ण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या उन्नत मार्गावर दोन्ही दिशांनी मेट्रोची चाचणी पूर्ण झाली आहे. या दरम्यानची 23 किलोमीटरची मेट्रोची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. तसेच, मेट्रो संचलनासाठी एक स्वतंत्र कंपनीदेखील नेमण्यात आली. मात्र, अद्याप मेट्रो धावण्यास मुहूर्त मिळाला नाही. या प्रकल्पाचे सुमारे 92 टक्के स्थापत्यविषयक काम पूर्ण झाले असून, सर्व स्थानके एकाच वेळी सुरू केली जाणार नाहीत. तर, 100 टक्के पूर्ण झालेली स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जातील. कामे पूर्ण होताच इतर स्थानके या मार्गाच्या जाळ्यात जोडली जाणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. तथापि, यावर एकमत होत नसल्याने ही मेट्रो प्रत्यक्षता कधी धावणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Pune Metro
Pimpri Chinchwad International Parcel Service: पिंपरी-चिंचवडमध्ये परदेशी पार्सलसाठी टपाल खात्याची विशेष सुविधा

37 पैकी 22 ट्रेन दाखल

माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर 37 मेट्रो ट्रेन म्हणजेच मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम धावणार आहेत. त्यापैकी 22 ट्रेन या यार्डात दाखल झाल्या असून, त्यांची चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. त्यात आता धावण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर आणखी 15 ट्रेन या मार्च महिन्याच्या अखेरी आंध्र प्रदेश येथील श्रीसिटी येथून दाखल होणार आहेत. साधारण 3 कोचच्या या मेट्रो असतील. विशेष म्हणजे याचे सर्व देखभाल दुरुस्तीचे जबाबादारी खासगी कंपनीने महिलांना दिली आहे.

Pune Metro
Vadgaon Maval Police Investigation: वडगाव मावळ पोलिसांची तत्परता; हरवलेली सोन्याची चैन काही तासांत परत

पुण्यात प्रथम थर्ड रेल करंट कलेक्शन

पुण्यातील इतर मेट्रोपेक्षा ही मेट्रोचे कनेक्शन वेगळे असून, शूज रेलेमध्ये असलेल्या प्रवाहाद्वारे पुढे सरकते. याला शूगियर्सदेखील म्हणतात. रेल्वेच्या बोगीमध्ये उपकरण बसवले जाते. ते विद्युतीकृत थर्ड रेलमधून पॉवर ट्रकमध्ये सरकवतात. ही मेट्रो साधारण 120 कि.मी.पर्यंत धावू शकते.

प्रकल्पाचे काम निर्धारित वेळे पूर्ण करण्याचे संबंधित कंपनीला स्पष्ट केले आहे. तसेच, कामातील तांत्रिक अडचणी व सद्यस्थितीची माहिती घेतली आहे. यावर लवकर निर्णय होईल.

डॉ. अभिजीत चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news