PCMC Illegal Construction Action: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचे आदेश

अतिक्रमण, होर्डिंग व पाणीचोरीवर कडक भूमिका; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
Construction
ConstructionPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्या बांधकामांवर तसेच, अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करा. ती कारवाई अधिक तीव आणि कडक करा, असे सक्त आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Construction
Chakan PMAY Site Theft: चाकणमध्ये पीएमएवाय साईटवर चोरी; 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

आयुक्तांनी प्रमुख अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, बेकायदा जाहिरात होर्डिंग अनधिकृत नळजोड आदीबाबत आढावा बैठक घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना ॲक्शन मोडमध्ये काम करण्यास बजावले. त्या बैठकीत आयुक्त बोलत होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, किशोर ननवरे, परशुराम वाघमोडे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे आदी उपस्थित होते.

Construction
YCM Hospital Nameboard Issue: वायसीएम रुग्णालयाचा नामफलक जीर्ण; ओळख पुसट

शहरातील अनेक भागांत अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्या संदर्भात दैनिक पुढारीने सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले आहेत. नियमितपणे कठोर कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. वारंवार सूचना देऊन धडक कारवाई होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आयुक्त म्हणाले की, शहरात विनापरवाना सुरू असलेल्या बांधकामांवर तात्काळ कारवाई करा. त्यांना नोटीसा बजावा. ती अधिकृत बांधकामे पूर्णपणे पाडा.

Construction
Pimpri World Malaria Day Awareness: पिंपरीत हिवताप दिनानिमित्त प्रभात फेरी; मलेरिया प्रतिबंधाची जनजागृती

ती कारवाई सातत्याने सुरू ठेवा अन्यथा दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. नागरिकांनी बांधकाम परवानगी नसलेल्या ठिकाणी सदनिका किंवा गाळे खरेदी करू नयेत. खरेदी करीत असलेले सदनिका किंवा गाळा अधिकृत बांधकाम परवानगी असल्याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अतिक्रमणमुक्त पदपथासाठी कारवाई मोहीम तीव करावी. पादचाऱ्यांना मोकळे आणि सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी अतिक्रमणमुक्त पदपथ मोहिमेला गती देण्यात यावी. विशेष पथके नेमून, क्षेत्रीयस्तरावर करवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Construction
Pimpri Hotel Assault: पिंपळे गुरवमध्ये बिलाच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा

अनधिकृत जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढा

शहराचे सौंदर्य राखण्यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. भिंती, विद्युत खांब, उड्डाणपूल, झाडे, कठडे आणि महावितरण कंपनीचे डीपी बॉक्सवर लावण्यात आलेले पोस्टर, जाहिरात फलक तात्काळ हटवण्यात यावेत. शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंगवर तसेच, फ्लेक्स, किऑक्सवरील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधितांना नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच, स्वच्छ सर्वेक्षणासाठी कचरा संकलन, विलगीकरण आणि व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

अनधिकृत नळजोड तोडून पाणीचोरी रोखा

शहरात असलेले अनधिकृत नळजोड शोधून काढून ते तात्काळ तोडा, असे आदेश आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. अनधिकृत नळजोड घेऊन पाणीचोरी केली जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात विस्कळीत होत आहे. त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पाणीचोरी होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आदेशही आयुतांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news