Pimpri Hotel Assault: पिंपळे गुरवमध्ये बिलाच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा

वाद मिटवायला गेलेल्या ग्राहकांना बेदम मारहाण; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पिंपरी: बिल देण्याच्या कारणावरून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ग््रााहकांना हॉटेलमालक आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) रोजी रात्री दीडच्या सुमारास पिंपळे गुरव येथील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली.

Assault
Pimpri Private Travels Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी ट्रॅव्हल्सवर धडक कारवाई; 16,982 बसवर दंड

याप्रकरणी सूरज शंकर झांजुर्णे (32, रा. भोसरी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास अनिलकुमार सेवाणी (25, रा. पिंपरी), आशिष सुनिल भेगडे (29, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे), प्रेम दिलबहादूर थापा (21, रा. काशिदनगर, पिंपळे गुरव) आणि अनिलकुमार अर्जनदास मेवाणी (52, रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assault
Hinjawadi Traffic Solution: हिंजवडीतील वाहतूककोंडीवर PMRDAचा उपाय; सहा नवीन जोडरस्ते होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक आणि कर्मचारी एका ग््रााहकासोबत बिलावरून वाद घालत होते. फिर्यादी आणि त्यांचे मित्र हा वाद सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी ‌’तुम्ही आमच्या मध्ये का येता‌’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि मुख्य आरोपीने हातातील कड्याने फिर्यादीच्या तोंडावर, नाकावर मारून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news