YCM Hospital Nameboard Issue: वायसीएम रुग्णालयाचा नामफलक जीर्ण; ओळख पुसट

मुख्य प्रवेशद्वाराकडे दुर्लक्ष; रुग्णांची दिशाभूल, दुरुस्तीची मागणी वाढली
YCM Hospital
YCM HospitalPudhari
Published on
Updated on

पिंपळे गुरव: शहराची ‌‘लाईफलाईन‌’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) येथे एकीकडे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा विस्तारत असताना दुसरीकडे मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकाची बिकट अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणा दाखवत आहे. दररोज हजारो रुग्णांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयाचा ‌‘चेहराच‌’ जणू हरवल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

YCM Hospital
Pimpri World Malaria Day Awareness: पिंपरीत हिवताप दिनानिमित्त प्रभात फेरी; मलेरिया प्रतिबंधाची जनजागृती

सुमारे 750 खाटांची क्षमता असलेल्या या महापालिका रुग्णालयात हृदयविकार, मूत्रपिंड विकार, प्लास्टिक सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग-प्रसूती, दंतरोग अशा विविध विभागांत उपचार उपलब्ध आहेत. अल्पदरात तसेच शासकीय योजनांतर्गत मोफत उपचार मिळत असल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी, खेड परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरले आहे. पोस्ट ग््रॉज्युएट इन्स्टिट्यूटमुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही कार्यरत आहे. मात्र, या सर्व सोयीसुविधांच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रवेशद्वारावरचे चित्र मात्र पूर्णतः विरुद्ध आहे.

YCM Hospital
Pimpri Hotel Assault: पिंपळे गुरवमध्ये बिलाच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा

नामफलकाची ओळखच पुसट

प्रवेशद्वारावर यशवंतराव चव्हाण रुग्णालय असे हाताने लिहिलेले अक्षर पूर्णपणे फिकट झाले आहे. पूर्वी बसविण्यात आलेली विद्युत (ङएऊ) अक्षरांची दुरवस्था होऊन पूर्वी लावलेले झगमगते एलईडी बोर्ड आता मोडकळीस आले असून, ते बंद अवस्थेत आहे. परिणामी प्रथमच येणाऱ्या रुग्णांना रुग्णालय ओळखणे कठीण जात आहे.

YCM Hospital
Pimpri Private Travels Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी ट्रॅव्हल्सवर धडक कारवाई; 16,982 बसवर दंड

प्रशासनाचा कानाडोळा

लाखो रुपयांचा निधी उपचारांवर खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाला एका नामफलकाची दुरुस्ती करण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रुग्णालयाची शान असणारा नामफलक पुन्हा दिमाखात उभारावा तसेच रुग्णालयाचा दर्जा व ओळख लक्षात घेता आधुनिक आणि स्पष्ट दिसणारा नवीन नामफलक तातडीने बसवावा. बंद पडलेली विद्युत अक्षरे दुरुस्त करून रुग्णालयाची ओळख पुन्हा ठळक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आत दिशादर्शक; बाहेर गोंधळ

रुग्णालयाच्या आतील भागात जझऊ व खझऊ विभागांसाठी नवीन दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी सूचना फलकही आहेत. तरीही मुख्य प्रवेशद्वारावरील नामफलकाकडे दुर्लक्ष झाल्याने बाहेरून येणाऱ्यांची दिशाभूल होत आहे.

YCM Hospital
Hinjawadi Traffic Solution: हिंजवडीतील वाहतूककोंडीवर PMRDAचा उपाय; सहा नवीन जोडरस्ते होणार

नवीन टेंडरमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात येतील. नेहमीप्रमाणे आम्ही फलकावरील अक्षरांची दुरुस्ती करत असतो. संबंधित कामे विद्युत विभागाकडून केली जातात. त्यांच्याशी योग्य समन्वय साधून दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण केली जातील.

चंद्रकांत गुंडाळ, स्थापत्य उपअभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, मनपा

रुग्णालयाच्या आत तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च करून मशिनरी घेता. मग, मुख्य प्रवेशद्वाराच्या सौंदर्यासाठी आणि ओळखीसाठी बजेट का नसावे. स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाला हा पुसट झालेल्या नामफलक दिसत नाही का? हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष आहे.

राजेश पोखरकर, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news