Pimpri World Malaria Day Awareness: पिंपरीत हिवताप दिनानिमित्त प्रभात फेरी; मलेरिया प्रतिबंधाची जनजागृती

वायसीएम रुग्णालयाचा पुढाकार; डास नियंत्रण व स्वच्छतेबाबत नागरिकांना संदेश
Malaria
MalariaPudhari
Published on
Updated on

पिंपरी: जागतिक हिवताप दिनानिमित्त सोमवारी (दि. 27) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) व पदव्युत्तर संस्था आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभाग यांच्यावतीने संत तुकारामनगर तसेच रुग्णालय परिसरात हिवताप (मलेरिया) जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंध, नियंत्रण आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

Malaria
Pimpri Hotel Assault: पिंपळे गुरवमध्ये बिलाच्या वादातून मारहाण; चौघांवर गुन्हा

प्रभात फेरीदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या यावर्षीच्या हिवताप निर्मूलनासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे, या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला. तसेच कोरडा दिवस पाळा, हिवताप टाळा, घराभोवती पाणी साठू देऊ नका, मच्छरदाणीचा वापर करा आणि पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा, अशा घोषणा देत प्रतिबंधात्मक उपायांची माहिती नागरिकांना देण्यात आली. हिवताप हा डासांमुळे होणारा आजार असून योग्य काळजी आणि सातत्यपूर्ण जनजागृतीद्वारे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असा संदेशही या वेळी देण्यात आला.

Malaria
Pimpri Private Travels Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये खासगी ट्रॅव्हल्सवर धडक कारवाई; 16,982 बसवर दंड

या प्रभात फेरीचे आयोजन पदव्युत्तर संस्था व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रशासन, जनआरोग्य वैद्यकशास्त्र विभागाचे (कम्युनिटी मेडिसिन) प्राध्यापक व कनिष्ठ निवासी डॉक्टर, यशवंतराव चव्हाण स्मृती परिचर्या विज्ञान संस्था महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच कुटुंब कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले.

Malaria
Hinjawadi Traffic Solution: हिंजवडीतील वाहतूककोंडीवर PMRDAचा उपाय; सहा नवीन जोडरस्ते होणार

या वेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. मुकेश बावा, सहायक प्राध्यापक सॅमसन लिओ यू, आरोग्य सहायक माणिक चव्हाण, एमपीडब्ल्यू संतोष काशीद तसेच कनिष्ठ निवासी डॉक्टर उपस्थित होते.

Malaria
Pimpri Bhama Askhed Water Project: भामा-आसखेड जलप्रकल्पात विलंब; ठेकेदार बडतर्फ, 84 कोटींची नवी निविदा

हिवतापाची लक्षणे अशी ओळखावीत

  • सतत किंवा अधूनमधून येणारा ताप

  • थंडी वाजणे आणि अंगावर शहारे येणे

  • डोकेदुखी आणि अंगदुखी

  • मळमळ किंवा उलट्या

  • अशक्तपणा व थकवा जाणवणे

  • अचानक घाम येणे

हिवताप टाळण्यासाठी या करा उपाययोजना

  • घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू देऊ नका

  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा

  • मच्छरदाणीचा नियमित वापर करा

  • पूर्ण अंग झाकणारे कपडे परिधान करा

  • खिडक्या-दरवाज्यांना जाळ्या लावा

  • डास प्रतिबंधक क्रीम/औषधांचा वापर करा

  • परिसर स्वच्छ ठेवा आणि कचरा साचू देऊ नका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news