Pimpri Chinchwad Gas Shortage Hotels: पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर फटका

इराण-इस्त्रायल तणावाचा परिणाम; हॉटेल्स बंद किंवा मर्यादित मेन्यूवर व्यवसाय
Gas Shortage Impact
Gas Shortage ImpactPudhari
Published on
Updated on

पिंपरी: इराण- इस्त्रायल युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा फटका पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक हॉटेल्सना तात्पुरते शटर खाली करावे लागले आहे, तर काहींनी केवळ मोजक्याच पदार्थांवर व्यवसाय सुरू ठेवण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी घराबाहेर राहणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

Gas Shortage Impact
Pimpri Chinchwad Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकरातून 961 कोटींची वसुली; ऑनलाईन भरण्याकडे नागरिकांचा कल

शहरातील हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलिंडरअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी पर्यायी उपाय म्हणून इंडक्शन किंवा पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला असला, तरी त्यातून मोठ्या प्रमाणावर पदार्थ तयार करणे शक्य होत नाही. परिणामी, मेन्यू कार्डमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

Gas Shortage Impact
Bhosari Bullock Cart Race: भोसरीत बैलगाडा शर्यतींचा थरार; भैरवनाथ उत्सवात ‘घाटाचा राजा’ ठरला

या परिस्थितीचा थेट परिणाम ग््रााहकांवरही दिसून येत आहे. हॉटेलमध्ये जाऊन अपेक्षित पदार्थ न मिळाल्याने अनेकांना परत जावे लागत आहे. गॅस तुटवड्यामुळे खर्चात वाढ झाल्याने हॉटेल चालकांनी दरही वाढवावे आहेत. मात्र, मेन्यूमध्ये दर्शविलेल्या किमती आणि प्रत्यक्ष बिल यामध्ये फरक आढळत असल्याने ग््रााहक आणि मालकांमध्ये किरकोळ वाद होत असल्याचेही समोर आले आहे.

Gas Shortage Impact
Maharashtra Piped Gas Shortage: गॅस टंचाईवर सरकारचा मोठा निर्णय; पाईप्ड गॅस जोडणीला वेग

व्यावसायिकांच्या मते:

गॅसचा पुरवठा सुरळीत होईपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. सरकारने तातडीने उपाययोजना करून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दरम्यान, नागरिकांनीही परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. गॅस सिलिंडर पुरवठा पूर्ववत झाल्यानंतरच शहरातील हॉटेल व्यवसाय पुन्हा रुळावर येईल, अशी आशा हॉटेल व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे.

Gas Shortage Impact
PMRDA PMAY Housing: पीएमआरडीएचा मोठा निर्णय; परवडणाऱ्या घरांसाठी ‘ॲक्शन प्लान

सध्याची परिस्थिती एका नजरेत:

  • अनेक लहान-मोठी हॉटेल्स पूर्णपणे बंद.

  • हॉटेल्समध्ये मर्यादित पदार्थ उपलब्ध.

  • थाळीमध्ये केवळ 1-2 भाज्या आणि साधे जेवण.

  • नाश्त्याच्या पदार्थांमध्येही कपात.

  • कॉफी, ग््राीन टी ऐवजी केवळ चहाची विक्री.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news