Bhosari Bullock Cart Race: भोसरीत बैलगाडा शर्यतींचा थरार; भैरवनाथ उत्सवात ‘घाटाचा राजा’ ठरला

12.26 सेकंदात विक्रमी कामगिरी; पारंपरिक शर्यतींनी रंगवला उत्सव
Bhosari Bullock Cart Race
Bhosari Bullock Cart RacePudhari
Published on
Updated on

भोसरी: श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भोसरी गावठाणातील बैलगाडा घाटात रंगलेल्या पारंपरिक शर्यतींनी यंदा अभूतपूर्व थरार अनुभवायला मिळाला. सकाळपासूनच बैलगाडा शौकिनांनी घाट परिसर गजबजून गेला होता. वेग, ताकद आणि अचूक समन्वय यांची अप्रतिम सांगड घालत स्पर्धकांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली.

Bhosari Bullock Cart Race
Maharashtra Piped Gas Shortage: गॅस टंचाईवर सरकारचा मोठा निर्णय; पाईप्ड गॅस जोडणीला वेग

भोसरी येथील बैलगाडा घाटाचे पूजन महापौर रवी लांडगे, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, सागर गवळी, विराज लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास लांडगे यांच्यासह माजी नगरसेवक पंडित गवळी, विजय फुगे, भानुदास फुगे, शेखर लांडगे, किशोर गव्हाणे, बाजीराव लांडगे, किसन शिंदे, गुलाब लांडगे, ॲड. गणेश फुगे नामदेव लांडगे, संजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Bhosari Bullock Cart Race
PMRDA PMAY Housing: पीएमआरडीएचा मोठा निर्णय; परवडणाऱ्या घरांसाठी ‘ॲक्शन प्लान

यंदाच्या शर्यतीत चऱ्होलीतील भाऊसाहेब गिलबले आणि गणेश सस्ते यांच्या बैलजोडीने 12.34 सेकंदात शर्यत पूर्ण करत “घाटाचा राजा” हा मान पटकावला. त्यांच्या या कामगिरीवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. फळी फोडीच्या थरारक फेरीत हिंदवी वडेवाले आणि समीर दाभाडे यांच्या जुगलबंदीतील बैलगाड्याने 12.57 सेकंदांची वेळ नोंदवत मान मिळविला. मात्र खरी रंगत अंतिम फेरीत पाहायला मिळाली. या फेरीत हिंदवी वडेवाले आणि समीर दाभाडे यांच्या बैलजोडीने अवघ्या 12.26 सेकंदात शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांकावर झेंडा रोवला.

Bhosari Bullock Cart Race
Kasarwadi Garbage Problem: कासारवाडीत कचऱ्यामुळे नागरिक हैराण; दुर्गंधी, अपघात आणि वाहतूक कोंडी

स्पर्धेतील इतर निकालही चुरशीचे ठरले. गणेश यादव यांच्या बैलजोडीने 12.40 सेकंदात शर्यत पूर्ण करत द्वितीय क्रमांक पटकावला. तर गिलबले-सस्ते यांच्या जोडीने 12.41 सेकंदात तृतीय आणि प्रकाश कबाड्डी यांच्या बैलजोडीने 12.47 सेकंदात चौथा क्रमांक मिळवला.

Bhosari Bullock Cart Race
Unseasonal Rain Impact Cold Drink Business: नवलेख उंबरेत थंड पेय व्यवसाय कोलमडला; अवकाळी पावसाचा फटका

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या शर्यती सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगल्या. दिवसभर घाटात जल्लोषाचे वातावरण होते. पारंपरिक बैलगाडा शर्यतींचा हा सोहळा म्हणजे ग््राामीण संस्कृतीचा जिवंत वारसा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अशोक लांडगे यांनी घड्याळ मास्तर, संदीप माने यांनी निशाण बहादूर काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news