Pimpri Chinchwad Gymnastics Hall Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये जिम्नॅस्टिक हॉल नाही; खेळाडूंची परवड

सुविधांच्या अभावामुळे खेळाडू अडचणीत; महापालिकेकडून ठोस निर्णयाची मागणी
Gymnastics
GymnasticsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: औद्योगिक नगरी आणि खेळाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात जिम्नॅस्टिक खेळाडूंची अवस्था मात्र दयनीयच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिम्नॅस्टिक हॉलसाठी सातत्याने मागणी करूनही महापालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत.

Gymnastics
Pimpri Chinchwad DBT Scheme Controversy: डीबीटीऐवजी क्यूआर कोडचा घाट; पिंपरी-चिंचवड शिक्षण विभागावर टीका

जागेची पाहणी, प्रस्ताव, चर्चा या पातळीवरच विषय अडकून पडला असून, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर हॉलची उभारणी वेळेत झाली असती, तर स्थानिक खेळाडूंना सरावासाठी अत्यंत उपयुक्त सुविधा मिळाली असती. मात्र, महापालिकेच्या ढिसाळ धोरणामुळे खेळाडूंमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

खेळाडूंची परवड, पालकांची धडपड

जिम्नॅस्टिक हा कौशल्यपूर्ण आणि खर्चिक खेळ मानला जातो. सरावासाठी आवश्यक असलेले मॅट्‌‍स, बॅलन्स बीम, बार्स यांसारखी उपकरणे महागडी असून, सर्वसामान्य कुटुंबांना हा खर्च परवडू शकत नाही. अनेक खेळाडूंना या क्रीडा प्रकारासाठी खासगी अकॅडमींचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक गुणी खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मागे पडत असल्याची खंत शहराच्या क्रीडाक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सुविधांचा अभाव असूनही पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी या खेळात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Gymnastics
Pimpri Chinchwad E Challan Camera Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चलन मशिनचा फज्जा; निकृष्ट कॅमेऱ्यांमुळे कारवाई ठप्प

स्पर्धा तोंडावर, तरीही प्रशासन सुस्तच

एरोबिक एशियन चॅम्पियनशिपसारखी मोठी स्पर्धा शहरात होणार असताना स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सराव करण्यासाठी कोणतीही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेरील खेळाडूंशी स्पर्धा करताना शहरातील खेळाडू या क्रीडाप्रकारात आपली चमक दाखवू शकणार नाहीत. त्यामुळे जिम्नॅस्टिक खेळाडूंच्या पालकांकडून शहरात तातडीने जिम्नॅस्टिक हॉलसाठी जागा निश्चित करण्यात यावी. तसेच, यासाठी आवश्यक निधी मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. महापालिकेने प्रशिक्षक व खेळाडूंशी समन्वय साधून जिम्नॅस्टिकला महापालिकेच्या क्रीडा धोरणात प्राधान्य द्यावे, अशीही मागणी केली जात आहे.

ठोस निर्णय घेण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड शहराने विविध क्रीडा प्रकारांमध्ये मोठी झेप घेतली असली, तरी जिम्नॅस्टिकसारख्या महत्त्वाच्या खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांची जिद्द आणि पालकांची धडपड यामुळेच हा खेळ टिकून आहे. मात्र, याला संस्थात्मक पाठबळ मिळाले तरच भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण खेळाडू घडू शकतील. महापालिकेने केवळ आश्वासनांवर न थांबता तातडीने ठोस निर्णय घेऊन जिम्नॅस्टिक हॉल उभारण्याची गरज आहे. अन्यथा, शहरातील उदयोन्मुख खेळाडूंचे स्वप्न अधांतरीच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Gymnastics
Pimpri Gas Pipeline Blast: पिंपरीत PNG गॅस पाईपलाईन फुटली; मोठा आवाज, नागरिकांमध्ये भीती

महापालिकेचे दुर्लक्ष्ा

महापालिकेने शहरात विविध खेळांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. यामध्ये कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, स्केटिंगसाठी स्वतंत्र मैदाने बॅडमिंटनसाठी तब्बल 16 हॉल, लॉन टेनिससाठी 12 कोर्ट उपलब्ध आहेत. मात्र, जिम्नॅस्टिकसाठी एकही अधिकृत हॉल उपलब्ध नाही. त्यामुळे जिम्नॅस्टिक या कौशल्याधारित खेळाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खेळाडूंकडून केला जात आहे.

नियोजनाचा अभाव

महापालिकेने मागील काही वर्षांत शहराच्या विविध भागांत क्रीडा प्रकल्प उभारले आहेत. चिंचवड, आकुर्डी, थेरगाव, निगडी परिसरात आधुनिक सुविधा असलेल्या व्यायामशाळा, क्रीडांगणे, हॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, जिम्नॅस्टिकसाठी कोणतीही ठोस तरतूद केलेली नाही. जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या प्रस्तावांना प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Gymnastics
PCMC Commissioner Meeting Time Controversy: आयुक्त भेट वेळ कपातीत वाद; पहिल्याच दिवशी गैरहजेरी

तरीही जिम्नॅस्टिकचा समावेश नाही

दरवर्षी 100 हून अधिक खेळाडू स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. सुमारे 25 ते 30 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात. अनेक खेळाडूंनी पदके मिळवून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. तरीही महापालिकेच्या प्राधान्यक्रमात जिम्नॅस्टिकचा समावेश नसल्याचे वास्तव खेदजनक आहे.

खेळाडूंनीच उभारल्या सुविधा

महापालिकेकडून सहकार्य न मिळाल्याने काही प्रशिक्षकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने खासगी अकॅडमी सुरू केल्या आहेत. सामाजिक संस्थांच्या मदतीने मर्यादित साहित्य उपलब्ध केले जात आहे. कमी साधनांमध्ये राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयारी करत असल्याची बाब खेळाडूंच्या जिद्दीचे उदाहरण असली तरी, प्रशासनाच्या अपयशाचेही द्योतक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news