Pimpri Chinchwad E Challan Camera Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चलन मशिनचा फज्जा; निकृष्ट कॅमेऱ्यांमुळे कारवाई ठप्प

अस्पष्ट फोटोमुळे नंबर प्लेट वाचणे कठीण; वाहतूक पोलिसांना रात्री कारवाईत मोठ्या अडचणी
E Challan Camera Issue
E Challan Camera IssuePudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक नियमभंग प्रकारांवर नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या ई-चलन मशिनच्या कॅमेऱ्यांची गुणवत्ता खालावली आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष कारवाईत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक ठिकाणी मशिनमधून घेतलेले फोटो अस्पष्ट येत असून, वाहनांचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने चलन तयार करताना संबंधितांना समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे काम मंदावले असून, विशेषतः रात्रीच्या वेळी धावत्या वाहनांवर दंड आकारणी करणे अशक्य होत आहे.

E Challan Camera Issue
Pimpri Gas Pipeline Blast: पिंपरीत PNG गॅस पाईपलाईन फुटली; मोठा आवाज, नागरिकांमध्ये भीती

मोबाईलवर फोटो वादाच्या भोवऱ्यात

काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून ते ई-चलन मशिनमध्ये अपलोड केल्याबाबत वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर वाहतूक विभागाने अधिक दक्षता घेतली असून, पोलिसांनी वैयक्तिक मोबाईलचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मशिनवरच अवलंबून राहावे लागत आहे.

मशिनमध्ये कालबाह्य कॅमेरा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाकडे सध्या वापरात असलेली ई-चलन मशिन ही प्रामुख्याने झळपश ङरली अ920 मॉडेलची आहेत. या मशिनमध्ये कालबाह्य होत असलेले केवळ 5 मेगापिक्सल कॅमेरा आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे एकूण 225 ई-चलन मशिन आहेत.

E Challan Camera Issue
PCMC Commissioner Meeting Time Controversy: आयुक्त भेट वेळ कपातीत वाद; पहिल्याच दिवशी गैरहजेरी

सध्याच्या मशिनमधील तांत्रिक बाबी

वाहतूक विभागाकडील ई-चलन मशिन ही अपवेीळव आधारित हँडहेल्ड डिव्हाइस असून 56 इंच टचस्क्रीन, इनबिल्ट कॅमेरा आणि 4ॠ/ॠझठड/थळ-ऋळ कनेक्टिव्हिटीसह कार्य करते. या मशीनमधून नियमभंगाचे फोटो कॅप्चर सुविधा असून, त्यात वाहन क्रमांक, गुन्ह्याचा प्रकार आणि ॠझड लोकेशन नोंदवले जाते. ब्लूटूथ प्रिंटरद्वारे ऑन-द-स्पॉट पावतीही देता येते. सॉफ्टवेअरद्वारे अधिकारी लॉगिन करून वाहन क्रमांक टाकताच तरहरप/डरीरींहळ डेटाबेसमधून मालकाची माहिती, ठउ, विमा व झणउ तपशील मिळतो आणि तत्काळ ई-चलन तयार होते. सर्व डेटा सेंट्रल सर्व्हरवर रिअल-टाइम पाठवला जातो; नेटवर्क नसल्यास ऑफलाइन सिंक सुविधा असते. अछझठ व जउठ तंत्रज्ञानामुळे नंबर प्लेट ओळखता येते, तर उउढत आणि खढचड प्रणालीशी जोडणीमुळे कारवाई शक्य होते. तसेच, फोटो, वेळ व लोकेशनमुळे पुरावा न्यायालयात ग्राह्य ठरतो.

E Challan Camera Issue
Pimpri Chinchwad Family Court Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये कुटुंब न्यायालयाची मागणी तीव्र

भरधाव वाहनांवर कारवाई करताना मर्यादा

भरधाव जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना पोलिसांना मोठी समस्या निर्माण होते. लांबून घेतलेल्या फोटोमध्ये वाहनाची नंबर प्लेट स्पष्ट न दिसल्याने कारवाई करणे अशक्य होत आहे. अनेकदा नंबर प्लेट अर्धवट किंवा अस्पष्ट दिसते. परिणामी, नियमभंग करणारे वाहनचालक वाहतूक नियमांच्या कचाट्यातून सुटत असल्याची भावना पोलिसांमध्ये आहे. शहरातील प्रमुख चौक, आयटी पार्क परिसर किंवा अधिक वर्दळीच्या रस्त्यांवर ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

नवीन अद्ययावत मशिन्सची मागणी

वाहतूक विभागाला अद्ययावत आणि उच्च गुणवत्तेच्या कॅमेऱ्यांसह नवीन ई-चलन मशिन उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. विशेषतः उच्च रिझोल्यूशन कॅमेरे, उत्तम ऑटो-फोकस, लो-लाईट कार्यक्षमता आणि जलद प्रोसेसिंग असलेली उपकरणे दिल्यास कारवाई अधिक प्रभावी होईल, असे मत वाहतूक पोलिसांकडून नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त होत आहे.

E Challan Camera Issue
Maval APMC Resignations: मावळ बाजार समितीत मोठी उलथापालथ; 13 संचालकांचे राजीनामे

छोटे क्रमांक मोठी समस्या

वाहनांवर कारवाई करताना आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे काही वाहनचालकांकडून जाणीवपूर्वक छोटे, स्टायलिश किंवा नियमबाह्य फॉन्टमध्ये नंबर प्लेट बसवली जाते. अशा प्लेट्स आधीच वाचणे कठीण असताना, खराब कॅमेरा गुणवत्तेमुळे ती पूर्णपणे टिपली जात नाही. यामुळे ई-चलन प्रणालीचा मुख्य उद्देशच धोक्यात येत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नंबर प्लेट वाचनासाठी आवश्यक असलेली जउठ (ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन) प्रणालीदेखील स्पष्ट प्रतिमेवर अवलंबून असल्याने, फोटो धूसर असल्यास संपूर्ण प्रक्रिया अयशस्वी ठरत असल्याचे सांगितले जाते.

तांत्रिकदृष्ट्या सक्षम, मात्र प्रत्यक्षात कमकुवत

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे वेगवेगळ्या कंपनीच्या ई- चलन मशिन आहेत. सध्या असलेल्या ई-चलन मशिनमध्ये कॅमेरा, ऑटो-फोकस, जीपीएस टॅगिंग, तसेच थेट सर्व्हरशी जोडलेले सॉफ्टवेअर अशी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. मात्र, प्रत्यक्षात या कॅमेऱ्यांचा फोकस व्यवस्थित होत नाही. कमी प्रकाशात वाहनांचे फोटो धूसर येतात; तसेच धावणाऱ्या वाहनांचे फोटो टिपताना मोशन ब्लर मोठ्या प्रमाणात दिसतो. परिणामी, संबंधित वाहनाची नंबर प्लेट वाचणे किंवा टिपणे कठीण होते. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेली प्रणाली प्रत्यक्ष वापरात मात्र कमकुवत ठरत असल्याची तक्रार रस्त्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news