Pimpri Gas Pipeline Blast: पिंपरीत PNG गॅस पाईपलाईन फुटली; मोठा आवाज, नागरिकांमध्ये भीती

पिंपरी-चिंचवडमधील मोहननगर येथे MNGL गॅस पाईपलाईन फुटल्याने स्फोटासारखा आवाज, एक जखमी, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Pimpri Gas Pipeline Blast
Pimpri Gas Pipeline BlastPudhari
Published on
Updated on

तुषार झरेकर

पिंपरी-चिंचवड: शहरातील मोहननगर परिसरात मंगळवारी दुपारी एमएनजीएल कंपनीची पीएनजी गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्फोटासारखा मोठा आवाज झाला आणि परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धावाधाव करत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.

Pimpri Gas Pipeline Blast
PCMC Commissioner Meeting Time Controversy: आयुक्त भेट वेळ कपातीत वाद; पहिल्याच दिवशी गैरहजेरी

दुपारी सुमारे एकच्या सुमारास ही घटना घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात दगड-माती हवेत उडाली. याचवेळी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर दगड लागल्याने तो जखमी झाला. सुदैवाने जखम किरकोळ असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

ही पाईपलाईन एमएनजीएलची असून त्यातून पीएनजी गॅस पुरवठा केला जातो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाईपलाईन टाकण्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Pimpri Gas Pipeline Blast
Pimpri Chinchwad Family Court Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये कुटुंब न्यायालयाची मागणी तीव्र

या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी घटनेचे भयावह स्वरूप सांगत मोठा आवाज झाल्यानंतर काही क्षण काय घडले हेच समजले नाही, असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. स्थानिक नागरिक मारुती भापकर, गणेश लंगोटे यांनीही या घटनेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news