Pimpri Chinchwad General Body Meeting: पिंपरी-चिंचवड महापालिका सभा आज; ‘नियमबद्ध की बेकायदा?’वरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

राष्ट्रवादीकडून महापौर-आयुक्तांना नोटीस; प्रशासनाचा सभा वैध असल्याचा दावा, २१ विषयांवर सभागृहात वादळी चर्चेची शक्यता
PCMC General Body Meeting
PCMC General Body MeetingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: नियमानुसार की बेकायदेशीर? यावरून वादात सापडलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.2) दुपारी दोनला होणार आहे. सभेसमोर एकूण 21 विषय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ती सभा बेकायदा असल्याचा आरोप करत महापौर व आयुक्तांना नोटीस बजावली आहे. तर, सत्ताधार्‍यांसह प्रशासनाने ती सभा नियमानुसारच असल्याचा दावा करत सभा होणार असल्याचा निर्धार केला आहे.

PCMC General Body Meeting
Dahi Handi Clay Pots: दहीहंडीला अवघे चार दिवस; उर्से-मावळच्या कुंभारवाड्यात २०० मातीच्या हंड्यांची लगबग

महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. सभेत 17 सप्टेंबरला होणार्‍या तहकूब सभेतील एकूण 17 विषय घेण्यात आले आहेत. बीआरटीएस मार्गावर ई-आरटीएस प्रवासी सेवा सुरू करणे. शहरात पार्किंग धोरण राबवणे. सार्वजनिक शौचालय धोरण राबवणे. अप्पू घर येथील अम्युजमेंट पार्कला 15 वर्षांची मुदतवाढ देणे. शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी चालू असलेल्या काही कामांचा निधी वाढवणे. प्राधिकरण, निगडी येथे महापौर निवासस्थान उभारण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणे. मोठ्या हाऊसिंग सोसायटीचा प्रक्रिया केलेले मैलासांडपाणी महापालिकेच्या ड्रेनेजलाईनला जोडण्यासाठी शुल्क आकारणे तसेच, विविध कामांच्या तरतुदीत वाढ-घट करणे आदींसह एकूण 21 विषय आहेत. दरम्यान, सभा नियमानुसार की नियमबाह्य या मुद्द्यावरून सभागृहात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

PCMC General Body Meeting
Dehu Road Ganeshotsav: देहूरोडचा गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’; पारंपरिक वाद्यांसह शांतता, सामाजिक सलोखा राखण्याचा मंडळांचा निर्धार

सभा नियमानुसार असल्याचा प्रशासनाचा दावा

महापालिकेची बुधवारी (दि.2) होणारी सर्वसाधारण सभा नियमानुसार आयोजित केली आहे. ती विहित कायदेशीर मार्गाने वैधरित्या आयोजित करण्यात आली आहे, असा दावा नगरसचिव मुकेश कोळप यांनी केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण दोन परिच्छेद 1 (म) नुसार कोणतीही सभा उपस्थित असलेल्या बहुसंख्य पालिका सदस्यांच्या संमतीने वेळोवेळी त्याच दिवशी नंतरच्या वेळेपर्यंत किंवा अन्य कोणत्याही दिवसापर्यंत तहकूब करता येईल. मात्र, कोणत्याही तहकूब सभेत जी सभा तहकूब करण्यात आली असे त्या सभेत जे कामकाज किंवा प्रस्ताव निकालात काढायचे राहिले असततील त्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही कामकाज चालविता येणार नाही आणि यात यापुढे तरतूद करण्यात आी असेल त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करता येणार नाही, अशी तरतूद आहे. तथापि, अशा सभेतील विषय अन्य सभेत घ्यावेत किंवा घेऊ नये याबाबत अधिनियमात कोणतीही तरतूद दिसून येत नाही, असे नगर सचिव विभागाने दिलेल्या खुलासात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल यांनी ती सभा बेकायदा असल्याची नोटीस महापौर, आयुक्त व नगर सचिव यांना सोमवारी (दि.31) दिली होती. त्याला नगर सचिव कोळप यांनी वरील उत्तर दिले आहे. तसेच, ती सभा विशेष नसून, सर्वसाधारण सभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

PCMC General Body Meeting
Sangvi Civic Issues: ‘स्मार्ट सिटी’ सांगवीत कचऱ्याचे साम्राज्य; मोकाट कुत्रे, अतिक्रमण अन् अधिकाऱ्यांच्या कारभारावर नगरसेवकांचा संताप

आक्षेपार्ह भाषा वापरू नका

सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, असंसदीय किंवा आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौरांच्या निर्देशांचे उल्लंघन किंवा सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असे वर्तन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगरसेवकांनी आपले मुद्दे वस्तुनिष्ठ, मुद्देसूद व सभागृहाच्या नियमांच्या चौकटीत मांडावेत. सभागृहातील शिस्तीचे गंभीर किंवा वारंवार उल्लंघन झाल्यास लागू नियम व तरतुदींनुसार संबंधित नगरसेवकांविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येऊ शकते, याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

निगडी ते चाकण मेट्रोचा विषय सभेसमोर नाही

मेट्रो मार्गिका, ई-आरटीएस वाहतूक व्यवस्था, पार्किंग धोरण आणि सार्वजनिक शौचालय धोरण आदी शहरासाठी आवश्यक असलेले महत्वाचे विषय सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत घेण्याचा ठराव स्थायी समितीने 25 ऑगस्टच्या सभेत केला होता. मात्र, त्या सभेच्या विषयपत्रिकेवर निगडी ते चाकण सुधारित मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मान्यता देण्याचा विषयाच गायब आहे. या मेट्रो मार्गासंदर्भात महापालिका सभागृहात तसेच, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात असे दोन वेळा नगरसेवकांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रो मार्गासाठी आग्रही आहेत, असे असताना मेट्रोचा विषय सभेसमोर न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषयही घेण्यात आलेला नाही.

PCMC General Body Meeting
MSRTC NCMC Smart Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी ‘खोळंबा’; सर्व्हर डाऊन, रिचार्ज बंद अन् सवलतीच्या तिकिटासाठी प्रवाशांची धावपळ

उपसूचना एक दिवस अगोदर दिल्यास स्वीकारणार

सभेतील विषयांवर उपसूचना मांडावयाची असल्यास ती शक्यतो सभेच्या किमान एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी, जेणेकरून संबंधित मूळ प्रस्तावाशी तिची सुसंगती, नियमबद्धता व प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे योग्य स्वरूपात मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणार्‍या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, याचीही नगरसेवकांनी नोंद घ्यावी, असे भाजपच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

सभागृहात वायफळ चर्चा नको-सत्ताधारी नगरसेवकांना सूचना

सर्वसाधारण सभेतील कामकाज, सभागृहाची प्रतिष्ठा, नगरसेवकांतील समन्वय, विषयांवरील चर्चा व सभागृहातील शिस्त याबाबत चर्चा करण्यात आली. महापालिका सभेचे कामकाज अधिक शिस्तबद्ध, नियमबद्ध व लोकहिताच्या विषयांवर केंद्रित राहावे, या दृष्टीने सत्ताधारी भाजपच्या सर्व नगरसेवकांना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या दालनात मंगळवारी (दि.5) झालेल्या बैठकीत सूचना देण्यात आल्या. प्रत्येक नगरसेवकाने सभागृहाची प्रतिष्ठा व सन्मान कायम राखावा. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हातवर करून महापौर यांची परवानगी घ्यावी. बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच आपले मत मांडावे. एकाच वेळी अनेक नगरसेवकांनी बोलणे, जागेवरून विनापरवानगी बोलणे, इतर नगरसेवकांच्या भाषणात अडथळा आणणे किंवा सभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे. विषयाशी संबंध नसलेले किंवा अनावश्यक अवांतर वक्तव्य टाळावे, अशा सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news