MSRTC NCMC Smart Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी ‘खोळंबा’; सर्व्हर डाऊन, रिचार्ज बंद अन् सवलतीच्या तिकिटासाठी प्रवाशांची धावपळ

वाहकांकडून कार्ड स्वीकारण्यास टाळाटाळ; ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना मनस्ताप, तक्रार केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
MSRTC Smart Card
MSRTC Smart CardPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसगाड्यांतून प्रवास करतेवेळी प्रवाशांना सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डसाठी (एनसीएमसी ) १ सटेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, पहिल्याच दिवशी वाहकांकडून स्मार्ट कार्ड स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. एसटीच्या कार्डला रिचार्ज होत नसून सर्व्हर डाऊनच्या समस्या आहेत. अनेक वाहकांकडून प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्यास टाळाटाळ करणे, तांत्रिक कारणांची बतावणी करत प्रवाशांची अडवणूक करणे असे प्रकार पहिल्याच दिवशी निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्ड सुविधेचे की समस्याचे, असा प्रश्न प्रवाशांकडून केला जात आहे.

MSRTC Smart Card
PMRDA Structural Plan: पीएमआरडीएच्या २० वर्षांच्या नियोजनाला वेग; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत प्रकल्पांची माहिती देण्याचे आदेश

एनसीएमसी हे एक संपर्करहित स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नसून, प्री- पेड वॉलेट म्हणून काम करते. यावर टॅप करून तिकीट काढता येते आणि व्यवहार पारदर्शक होतात. प्रवाशांच्या वाढत्या मागण्या व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, काही बसमार्गांवर वाहकांकडून प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड मशीनवर स्कॅन करण्यास नकार देणे, मशीन चालत नाही किंवा तांत्रिक बिघाड आहे असे कारण पुढे करत सवलतीचे तिकीट नाकारणे, असे प्रकार कर्मचाऱ्यांकडून पहिल्याच दिवशी घडल्याचे उघड झाले आहे. एसटीच्या कार्डला रिचार्ज होत नसून सर्व्हर डाऊन समस्या येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांच्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.

MSRTC Smart Card
Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्क अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेत; वाहतूक कोंडीसह नागरी समस्यांना मिळणार ‘ब्रेक’

त्यामुळे प्रवासी-वाहक यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी होत असल्याचे प्रवासी सांगतात, तर ज्येष्ठांसाठी हे स्मार्ट कार्ड डोकेदुखी ठरत आहे. एसटी प्रवाशांना विनाकारण त्रास देण्याऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात एस.टी. महामंडळाकडून केली जाणार आहे. आजपासून प्रवाशांच्या सेवेत एनसीएमसी कार्ड दाखल झालेले आहे. तसेच प्रवाशांना विनाकारक त्रास देणाऱ्या वाहकांची तक्रार केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

MSRTC Smart Card
Pimpri Car Reels Case: नवीन कारच्या रील्ससाठी महामार्गावर स्टंटबाजी; वाहनांची आडवी रांग, गुन्हा दाखल

एनसीएमसी कार्डमध्ये 100 रुपये बॅलन्स अनिवार्य

एसटी महांमडळाच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश सवलतीची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती, रोख व्यवहार करणे हा आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नसून प्री-पेड वॉलेट म्हणून काम करते. यावर टॅप करून तिकीट काढता येते. तसेच विद्यार्थ्यांचे कार्ड सरल क्रमाकांशी, ज्येष्ठ महिलांचे आधार आणि दिव्यागांचे युडीआयडी क्रमाकांशी लिंक केले आहे. तसेच नवीन कार्डसाठी रुपये 199 जुने कार्ड जमा केल्यानंतर 149 या किंमतीत नवीन कार्ड प्राप्त होते. या कार्डमध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स अनिवार्य आहे. तसेच 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्यात येईल.

MSRTC Smart Card
Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेवरून राष्ट्रवादी आक्रमक; १८ विषयांवर बहलांची कायदेशीर नोटीस

खात्याअंतर्गत कठोर कारवाई

एसटी महामंडळाच्या प्रवाशांना विनाकारण त्रास देणाऱ्या किंवा सवलतीच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या वाहक आणि आगार प्रमुखांना महामंडळाने सक्त ताकीद दिली आहे. एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या तक्रारीची खात्री पटल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर खात्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार नाही. असे प्रकार घडल्यास तक्रार करावी. असे आवाहन एसटीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

वाहकांची तक्रार करण्याची संबंधीत बसचा क्रमांक, मार्ग, वाहकाचे नाव व वेळ नमूद करून एसटीच्या टोल- फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे लिखित स्वरुपात तक्रार नोंदवावी. आजपासून प्रवाशांच्या सेवेत एनसीएमसी कार्ड दाखल झालेले आहे

अरण सिया, विभाग नियंत्रक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news