Dahi Handi Clay Pots: दहीहंडीला अवघे चार दिवस; उर्से-मावळच्या कुंभारवाड्यात २०० मातीच्या हंड्यांची लगबग

रंगरंगोटी आणि कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात; उत्पादन खर्च वाढूनही हंड्यांच्या दरात वाढ नाही, स्थानिक कारागिरांना चांगल्या विक्रीची अपेक्षा
Clay Pots
Clay PotsPudhari
Published on
Updated on

उर्से मावळ: गोपाळकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. परिसरातील कुंभारवाड्यात दहीहंडीसाठी मातीच्या हंड्या तयार करण्याची लगबग सुरू आहे. कारागिरांकडून हंड्यांवर आकर्षक रंगरंगोटी आणि कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Clay Pots
Dehu Road Ganeshotsav: देहूरोडचा गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’; पारंपरिक वाद्यांसह शांतता, सामाजिक सलोखा राखण्याचा मंडळांचा निर्धार

यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी परिसरातील कारागिरांनी मोठी तयारी केली आहे. जवळपास १५० ते २०० मातीच्या हंड्या तयार करून ठेवल्या आहेत. अनेक दिवसांपासून माती मळणे, आकार देणे, वाळवणे, भट्टीत भाजणे आणि त्यानंतर रंगरंगोटी करणे, अशी प्रक्रिया करून या हंड्या तयार केल्या जातात. प्रत्येक हंडीमागे कारागिरांची अनेक तासांची मेहनत आणि कौशल्य असते.

Clay Pots
Sangvi Civic Issues: ‘स्मार्ट सिटी’ सांगवीत कचऱ्याचे साम्राज्य; मोकाट कुत्रे, अतिक्रमण अन् अधिकाऱ्यांच्या कारभारावर नगरसेवकांचा संताप

सणाला अवघे चार दिवस शिल्लक असल्यामुळे दहीहंडी मंडळांकडून तसेच शाळकरी मुलांकडून हंडी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा हंड्यांचे बुकिंग चांगले झाल्याचे कारागिरांनी सांगितले. सध्या उर्से मावळ परिसरातील बाजारात 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विविध आकार आणि प्रकारच्या मातीच्या हंड्या उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, यंदा उत्पादन खर्च वाढला असतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हंड्यांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे कारागिरांनी सांगितले.

Clay Pots
MSRTC NCMC Smart Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी ‘खोळंबा’; सर्व्हर डाऊन, रिचार्ज बंद अन् सवलतीच्या तिकिटासाठी प्रवाशांची धावपळ

खर्चात वाढ

माती, रंग, इंधन आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यातच हंड्या तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनतही खर्च होते. मोठ्या प्रमाणावर हंड्या तयार करून ठेवल्यानंतर त्यांची विक्री झाली नाही, तर गुंतवलेले मूळ भांडवलही अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभारवाड्यातील कारागिर आसपासच्या बाजारपेठेत जावून याची विक्री करत आहेत.

Clay Pots
PMRDA Structural Plan: पीएमआरडीएच्या २० वर्षांच्या नियोजनाला वेग; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत प्रकल्पांची माहिती देण्याचे आदेश

स्थानिक कुंभारांकडून हंड्या खरेदी करण्याची मागणी

दहीहंडी उत्सवात पारंपरिक मातीच्या हंड्यांना विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळात सजावटीच्या आणि इतर पर्यायांचा वापर वाढत असला, तरी पारंपरिक मातीची हंडी ही उत्सवाची ओळख मानली जाते. त्यामुळे दहीहंडी मंडळांनी आणि नागरिकांनी स्थानिक कुंभारांकडून मातीच्या हंड्या खरेदी केल्यास या पारंपरिक व्यवसायाला हातभार लागेल, अशी अपेक्षा कारागिरांकडून व्यक्त होत आहे. यंदाच्या दहीहंडीच्या हंगामातून अपेक्षित उत्पन्न मिळणार का, हा प्रश्न सध्या कुंभारवाड्यातील कारागिरांसमोर उभा आहे.

हंड्या तयार करण्यासाठी जास्त मेहनत लागते. गेल्या वर्षी सणाच्या तुलनेत यंदा चांगली मागणी आहे. यंदा हंडी तयार करण्यासाठी माती, रंग, इंधन आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे याची चांगली विक्री व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.

भाऊसाहेब दत्तात्रेय कुंभार, परंदवडी कारागीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news