Electric Vehicle Policy PCMC: महापौरांसह पदाधिकाऱ्यांना पेट्रोल वाहने; PCMCच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणावर प्रश्नचिन्ह

79 ईव्ही भाड्याने असूनही महापौर रवी लांडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पेट्रोल वाहनांचा वापर; पर्यावरणप्रेमींकडून नाराजी
Electric Vehicle Policy PCMC
Electric Vehicle Policy PCMCPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामासाठी तसेच, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे महापालिकेचे धोरण आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा तसेच, भाड्याने घेण्याचा निर्णय झाला आहे. त्या धोरणानुसार आतापर्यंत तब्बल 79 इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत. मात्र, नवनियुक्त महापौरांसह उपमहापौर, पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांना इलेक्ट्रिक वाहनाएवेजी पेट्रोलवरील वाहने उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेस आपल्याच इलेक्ट्रिक वाहन वापराच्या धोरणाचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Electric Vehicle Policy PCMC
Oxygen Park PCMC: दुर्गादेवी टेकडीवर ‘स्व. गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ची घोषणा; नामांतरावरून पिंपरीत वाद

पर्यावरण आणि वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्र शासनाच्या 23 जुलै 2021 च्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे. ‌‘माझी वसुंधरा‌’ धोरणाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमास चालना मिळण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे. तसेच, नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी नवीन आणि अक्षय उर्जा मंत्रालयाच्या विविध कार्यक्रम आणि धोरणांच्या उपलब्धतेवर आधारित नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प विकसित करणे विचारधीन आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय वापरासाठी भाडे तत्त्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने ही इलेक्ट्रिक असतील. शहरबाहेरील दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाची सक्ती नाही.

Electric Vehicle Policy PCMC
PCMC Budget: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात 1500 कोटींची घट; मोठ्या विकासकामांवर टांगती तलवार

शहरात वायू व ध्वनी प्रदूषण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने वापराच्या धोरणास मंजुरी दिली आहे. महापालिकेने 5 जुलै 2022 पासून इलेक्ट्रिक वाहने भाड्याने घेण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत एकूण 79 इलेक्ट्रिक वाहने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. त्यासाठी विनाचालक महिन्यास 44 हजार ते 54 हजार रुपये तर, चालकासह दिवसाला 1 हजार 931 रुपये शुल्क महापालिका खासगी एजन्सीला देत आहे. त्या धोरणानुसार महापालिका शहरात 20 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशनची उभारणी करत आहे. असे असताना नवनियुक्त महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना महापालिकेच्या कार्यशाळेने पेट्रोल इंधनावरील वाहन उपलब्ध करून दिले आहे. या पदाधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. महापालिकेस आपल्या धोरणाचा विसर पडल्याचे दिसत आहे.

Electric Vehicle Policy PCMC
Patas Daund Car Fire: पाटस येथे धावत्या चारचाकीला भीषण आग; वाहन जळून खाक, अर्धा तास वाहतूक ठप्प

प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेस अनेक पुरस्कार

पिंपरी-चिंचवड शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणासह जलप्रदूषण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. वातावरणातील धुळी कण कमी व्हावेत यासाठी ड्राय मिस्ट बेस्ड फाउंटन, स्टेशनरी कॉग कॅनन तसेच, ट्रक मॉन्टेड फॉग कॅनन वाहनाद्वारे पाण्याचे तुषार हवेत उडवले जात आहेत. तसेच, यांत्रिक पद्धतीने मोठे रस्ते स्वच्छ केले जात आहेत. नदीत दूषित पाणी मिसळू नये, यासाठी सांडपाण्याची जलवाहिनी टाकून मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रास जोडण्यात आल्या आहेत. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडले जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यापासून वीज, सीएनजी व इतर इंधन तयार केले जात आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे महापालिकेस अनेक पुरस्कार मिळाले आहे. माझी वंसुधरा 5.0 अभियानात महापालिकेस राज्यातील प्रथम क्रमाकांचा दहा कोटी रुपयांचा पुरस्कार शनिवारी (दि. 21) मिळाला आहे.

Electric Vehicle Policy PCMC
Nira Left Canal Water: निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू; बारामती-इंदापूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अधिकाऱ्यांच्या दिमतीला इलेक्ट्रिक वाहने

महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. शहरी दळणवळण, विद्युत, पर्यावरण, स्थापत्य, आरोग्य वैद्यकीय, निवडणूक, क्रीडा, वायसीएम रुग्णालय, सामान्य प्रशासन, पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मलन, आकाशचिन्ह व परवाना, मध्यवर्ती भांडार, पशुवैद्यकीय, उद्यान, समाज विकास, सर्व आठ क्षेत्रीय अधिकारी, नगररचना, माहिती व जनसंपर्क, कामगार कल्याण, अग्निशमन, यांत्रिकी, ड्रेनेज, भूमि संपादन विशेष अधिकारी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना वाहने देण्यात आली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होत आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता अनिल भालसाकळे यांनी सांगितले.

ती वाहने नवीनच आहेत

महापौर तसेच, पदाधिकाऱ्यांसाठी मागील पंचवार्षिकेच्या अखेरीस नव्याने वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ती वाहने नवीन असल्याने त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Electric Vehicle Policy PCMC
Mumbai Pune Expressway Gas Tanker Accidents: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर अपघातांची मालिका; प्रवाशांत वाढती चिंता

ईव्ही वाहन वापरून महापौरांनी प्रत्यक्ष कृती करावी

देशातील अनेक शहराचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली व पुण्याचे प्रदूषण धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रदूषणही वाढण्याचा धोका आहे. महापौर रवी लांडगे यांनी स्वत: इलेक्ट्रिक वाहन वापरून नागरिकांसमोर आदर्श ठेवावा. शहरातील वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण कमी करण्याबाबत महापौर सातताने बोलत आहेत. त्यांनी ती बाब कृतीतून दाखवून देणे गरजेचे आहे, असे पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमचे तुषार शिंदे यांनी सांगितले.

ईव्ही वाहनासाठी आयुक्तांना पत्र देणार

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी हातभार लावणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक वाहन वापरास मी प्राधान्य देईन. तसे पत्र आयुक्तांना देणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

शहराचा प्रथम नागरिक इलेक्ट्रिक वाहन वापरत नसल्याने नाराजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी इलेक्ट्रिक वाहने वापरत आहेत. त्यानुसार, महापौर रवी लांडगे हे इलेक्ट्रिक वाहन वापरत नाहीत. त्यातून चुकीचा संदेश जात आहे. ते शहराचे प्रथम नागरिक असून, ते इलेक्ट्रिक वाहन वापरत नसल्याने शहरातील पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news