Patas Daund Car Fire: पाटस येथे धावत्या चारचाकीला भीषण आग; वाहन जळून खाक, अर्धा तास वाहतूक ठप्प

दौंड-पाटस अष्टविनायक महामार्गावरील गार फाटा परिसरात घटना; चालक बचावला, स्थानिकांनी केली मदत
पाटस (ता. दौंड) येथील दौंड-पाटस मार्गावर गार फाटा येथे अचानक पेट घेतलेले चारचाकी वाहन.  छायाचित्र - अक्षय देवडे, पाटस
पाटस (ता. दौंड) येथील दौंड-पाटस मार्गावर गार फाटा येथे अचानक पेट घेतलेले चारचाकी वाहन. छायाचित्र - अक्षय देवडे, पाटसPudhari
Published on
Updated on

पाटस : पाटस (ता. दौंड) परिसरातील दौंड - पाटस अष्टविनायक महामार्गावर शुक्रवारी (दि. २७) सकाळी पावणे अकराच्या सुमारास चारचाकी वाहनाला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पाटस (ता. दौंड) येथील दौंड-पाटस मार्गावर गार फाटा येथे अचानक पेट घेतलेले चारचाकी वाहन.  छायाचित्र - अक्षय देवडे, पाटस
Shrigonda Municipal Council: श्रीगोंदा नगरपरिषदेचा 221 कोटींचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प मंजूर; शिवस्मारक, तीर्थक्षेत्र विकास व पायाभूत सुविधांना मोठी चालना

स्थानिक नागरिकांच्या मिळालेल्या माहितीनुसार, चालक पाटसवरून दौंडकडे जात होता. गार फाटा परिसरात चारचाकी वाहनातून अचानक धूर निघू लागला. चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. काही क्षणातच इंजिन भागातून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा उसळल्या आणि वाहनाने भयंकर पेट घेतला.

आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी पाण्याच्या बादल्या आणून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी वाहतूक बाजूला वळवून पुढील अपघात टाळण्याचे काम केले; मात्र आग प्रचंड असल्याने काही मिनिटांतच संपूर्ण वाहन ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडले.

पाटस (ता. दौंड) येथील दौंड-पाटस मार्गावर गार फाटा येथे अचानक पेट घेतलेले चारचाकी वाहन.  छायाचित्र - अक्षय देवडे, पाटस
Nira Left Canal Water: निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू; बारामती-इंदापूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या घटनेदरम्यान दौंड-पाटस मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांची व भाविकांची मोठी गैरसोय झाली.

या आगीच्या घटनास्थळी पोलिस प्रशासन उशिरा पोहोचल्याची चर्चा परिसरात रंगली. त्यामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याची मागणी केली.

पाटस (ता. दौंड) येथील दौंड-पाटस मार्गावर गार फाटा येथे अचानक पेट घेतलेले चारचाकी वाहन.  छायाचित्र - अक्षय देवडे, पाटस
Junnar Onion Farmers: उत्पादन भरघोस, पण भाव कवडीमोल; जुन्नरच्या कांदा उत्पादकांचा संताप

दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वाहनांमध्ये वायरिंग बिघाड, इंजिन ओव्हरहिटिंग किंवा इंधन गळतीमुळे आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वाहनतज्ज्ञ सांगतात. त्यामुळे वाहनधारकांनी नियमित सर्व्हिसिंग, वायरिंग तपासणी आणि अग्निशामक यंत्र ठेवण्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक सुरक्षित बचावला असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news