Oxygen Park PCMC: दुर्गादेवी टेकडीवर ‘स्व. गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क’ची घोषणा; नामांतरावरून पिंपरीत वाद

इंदिरा गांधी उद्यानाचे नाव कायम राहणार असल्याचे महापौरांचे स्पष्टीकरण; नागरिकांकडून विरोधाची भूमिका
Oxygen Park PCMC
Oxygen Park PCMCPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील स्व. इंदिरा गांधी उद्यान म्हणजेच दुर्गादेवी टेकडीवर महापालिकेच्या वतीने दाट वन साकारून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्ययवात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे. त्याला स्व. गोपीनाथ मुंडे ऑक्सिजन पार्क असे नाव देण्यात येईल, असे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले आहे. मात्र, इंदिरा गांधी आणि दुर्गादेवी टेकडी या ठिकाणी व्यायामास तसेच, चालण्यास येणाऱ्या नागरिकांनी विरोध केला आहे.

Oxygen Park PCMC
PCMC Budget: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात 1500 कोटींची घट; मोठ्या विकासकामांवर टांगती तलवार

दुर्गा टेकडीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑक्सिजन पार्क, असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने गुरुवारी (दि. 26) प्रसिद्ध केले आहे. त्याची दखल घेऊन नागरिकांनी या नामकरणास विरोध केला आहे. विरोधकांकडून पर्यावरणाच्या नावाखाली काँग्रेसकालीन प्रतीक हटवून भाजपशी संबंधित नाव पुढे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, शहरात महापालिकेचे सुमारे 203 उद्याने असताना विद्यमान उद्यानाचे नामांतर करूनच ऑक्सिजन पार्क उभारण्याची गरज काय, असा

Oxygen Park PCMC
Patas Daund Car Fire: पाटस येथे धावत्या चारचाकीला भीषण आग; वाहन जळून खाक, अर्धा तास वाहतूक ठप्प

सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प, जैविक शेतीला प्रोत्साहन आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाविरोधात कठोर उपाययोजना या मागण्या स्वागतार्ह असल्या तरी, नामांतराच्या मुद्द्यामुळे मूळ विषय बाजूला पडू नये, अशी भावना व्यक्त होत आहे. उद्यानाला दुर्गा टेकडी हे नाव 50 वर्षांपासून आहे. ते नाव बदलण्यात येऊ नये. त्यासंदर्भात योग्य विचार विनिमय करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजपचे सचिन काळभोर यांनी व्यक्त केली आहे.

Oxygen Park PCMC
Nira Left Canal Water: निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू; बारामती-इंदापूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नावात बदल केला जाणार नाही

दुर्गादेवी टेकडीवर 85 एकर जागा आहे. त्यापैकी 10 एकर जागेत दाट वन निर्माण केले जाणार आहे. त्या प्रकल्पास स्व. गोपीनाथ मुंडे ऑक्सिन पार्क असे नाव दिले जाणार आहे. इंदिरा गांधी उद्यान किंवा दुर्गादेवी टेकडी हे नाव कायम राहणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news