Pimpri Chinchwad Road Divider Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये तुटलेले रस्ता दुभाजक ठरताहेत धोकादायक; अपघाताची शक्यता वाढली

बीआरटी मार्ग, चौक आणि प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांची दुरवस्था; महापालिकेकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी
Pimpri Chinchwad Road Divider Issue
Pimpri Chinchwad Road Divider IssuePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गालगत तसेच प्रमुख रस्ते, चौक आणि उपनगरांमधील अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या रस्ता दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अज्ञात भरधाव वाहनांच्या धडकेमुळे तुटलेले रस्ता दुभाजक अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे; मात्र या धोकादायक परिस्थितीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Pimpri Chinchwad Road Divider Issue
Kasarwadi Garbage Issue: कासारवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; पदपथ अन् उद्यानाशेजारील जागा बनल्या डम्पिंग ग्राउंड

उद्योगनगरीत वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक व्यवस्था कोलमडू नये म्हणून अनेक ठिकाणी महापालिकेकडून रस्ता दुभाजक बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी हे दुभाजक तुटलेले असून ते इतर वाहन चालकांसाठी धोक्याचे ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात पाणी साचल्याने वाकलेले किंवा तुटलेले दुभाजक वाहन चालकांच्या नजरेस पडत नाहीत. त्यामुळे या दुभाजकांना धडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pimpri Chinchwad Road Divider Issue
Pimpri Chinchwad Dangerous DP Box: पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक डीपी बॉक्सचा विळखा; उघड्या वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

शहरातील काही वळणांवर रस्ता दुभाजकाचा भाग रस्त्याच्या दिशेने बाहेर आल्याने वेगात जाणारे वाहन धडकून वाहन चालकाला गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांची धडक झाल्यानंतर नुकसानग्रस्त दुभाजक तातडीने बदलणे अथवा तेथे इशारा फलक, रिफ्लेक्टर अथवा सुरक्षा बॅरिकेड लावणे गरजेचे आहे; मात्र अनेक ठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी अशी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.

Pimpri Chinchwad Road Divider Issue
Lonavala Bhushi Dam Business: भुशी धरणाची जागा आता लोणावळा नगर परिषदेच्या ताब्यात; स्थानिक व्यावसायिकांसाठी २५ लाखांचे भाडे

अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळेत ओळखून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील तुटलेले अथवा दुरवस्था झालेले दुभाजक नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण करणारे आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीची मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अन्यथा अपघात घडल्यानंतर नेहमीप्रमाणे पालिका यंत्रणेस जाग येऊन उपयोग काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Pimpri Chinchwad Road Divider Issue
Wadgaon Talegaon Traffic Congestion: वडगाव-तळेगाव महामार्गावरील वाहतूककोंडी कायम; पोलिसांच्या उपाययोजनांना रस्ते विकास महामंडळाचा प्रतिसाद नाही

कामानिमित्त मी शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावरून दररोज ये-जा करतो. शहरात अनेक ठिकाणचे रस्ता दुभाजक तुटलेले आहेत; तसेच त्यांची दुरवस्था झाली आहे. रात्री किंवा पावसात तुटलेले रस्ता दुभाजक दिसून न आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तुटलेले रस्ता दुभाजक काढून त्याठिकाणी नवीन दुभाजक बसवावेत.

मोहन रामटेके, दुचाकीस्वार

शहरातील तुटलेले तसेच दुरवस्था झालेल्या दुभाजकांची पाहणी करून, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती केली जाईल; तसेच आवश्यक तेथे सुरक्षा उपाय योजना करण्यात येतील.

विजय भोजने, बीआरटी रस्ता आस्थापना अधिकारी पीसीएमसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news