Wadgaon Talegaon Traffic Congestion: वडगाव-तळेगाव महामार्गावरील वाहतूककोंडी कायम; पोलिसांच्या उपाययोजनांना रस्ते विकास महामंडळाचा प्रतिसाद नाही

मुंबई-पुणे महामार्गावर पाच किलोमीटरसाठी अर्धा तास प्रवास; अपघात रोखण्यासाठी सुचवलेल्या उपायांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: वडगाव-तळेगाव दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेली वाहतूककोंडी व अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजनांच्यादृष्टीने पत्रव्यवहार केला, परंतु रस्ते विकास महामंडळ प्रशासनाकडून यासंदर्भात कुठलेच सहकार्य होत नसल्याचे दैनिक पुढारीच्या वृत्तानंतर समोर आले आहे. त्यांच्या अनास्थेमुळे आज वाहतूककोंडीला सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याचे दिसत आहे.

Traffic Police
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत घेवडा, शेवगा, ढोबळीची आवक वाढली; भाज्यांचे दर काहीसे नरमले

मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव शहरातील पूर्वेकडील प्रवेशद्वार ते वडगाव-तळेगाव फाटा या भागात दररोज सातत्याने वाहतूककोंडी होत असून, पर्यायी मार्ग असलेल्या एमआयडीसी रस्ता, वडगाव-तळेगाव साखळी रस्ता या रस्त्यावर ही वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे अवघे पाच किलोमीटर अंतर असलेल्या वडगावहून तळेगावला जाण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. या सदर्भात दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध करून सतत होणाऱ्या वाहतूककोंडीची कारणे तसेच यावर आवश्यक असणारे उपाययोजनाची गरज प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

Traffic Police
Pimpri Chinchwad Road Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा; अपघातातील ६१ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे

उपाययोजनांकडे दुर्लक्ष

दरम्यान, वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी वडगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच शहरातील व परिसरातील वाहतूककोंडी रोखण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे काम हाती घेतले. शहरातील प्रमुख मंडळींशी चर्चा करून विविध उपाययजना राबविण्याचा निर्णय घेतला व त्या संदर्भात रस्ते विकास महामंडळ तसेच वडगाव नगरपंचायत प्रशासनालाही लेखी पत्र व्यवहार केला आहे, परंतु दि.९ जून रोजी लेखी पत्र देऊनही रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने दोन महिने उलटून गेले तरी या संदर्भात कुठलीही कार्यवाही केलेली दिसत नाही. तसेच, वडगाव नगरपंचायतनेही अपेक्षित तयारी दर्शवली नाही. त्यामुळे वाहतूककोंडी रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजना करता आलेल्या नाहीत.

Traffic Police
Pimpri Chinchwad Smart City Failure: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा ‘डिजिटल’ कारभार संकटात; ५ हजार सीसीटीव्ही बंद, ११२ कोटींची ई-ऑफिस प्रणाली ठप्प

रस्ते विकास महामंडळाकडे सुचवलेल्या उपाययोजना

  • यु-टर्न व सर्व्हिस रोडचे अचूक स्थान, लांबी व रुंदी तांत्रिक सल्लागारांच्या शिफारसीनुसार निश्चित करण्यात यावी

  • अपघात प्रवण ठिकाणी आवश्यकतेनुसार रस्ता रुंदीकरण करावे

  • खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी

  • रोड सेफ्टी ऑडिट करून आवश्यक बदल करावेत

  • रस्त्याच्या साईड शोल्डर्स व ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा करावी

  • मानक दर्जाचे संबल स्ट्रिप्स बसवावेत

Traffic Police
Pimpri Chinchwad Footpath Encroachment: पिंपरी-चिंचवडमधील ‘स्मार्ट’ पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात; नागरिकांचा सवाल- चालायचे कुठून?
  • आवश्यक ठिकाणी ब्लिंकर सिग्नल बसवावेत

  • आवश्यकतेनुसार कॅश बेरियर्स व डिव्हायडर्स उभारावे

  • दृश्यमानता वाढण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्ट्रीट लाईट्स बसवावे

  • वेग मर्यादेचे स्पष्ट व परावर्तित फलक लावावेत

  • दिशादर्शक व माहिती पर फलक लावावेत

  • आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत

  • सर्व चौक व यु-टर्न परिसरात झेब्रा क्रॉसिंगचे नूतनीकरण करावे

  • महामार्गालगतची सर्व अनधिकृत अतिक्रमणे व अवैध जाहिरात फलक तातडीने हटविण्यात यावेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news