Lonavala Bhushi Dam Business: भुशी धरणाची जागा आता लोणावळा नगर परिषदेच्या ताब्यात; स्थानिक व्यावसायिकांसाठी २५ लाखांचे भाडे

चार महिन्यांसाठी रेल्वेकडून जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय; २५ ते ३० स्थानिकांना रोजगाराचा मार्ग खुला, धोरणाकडे लक्ष
Lonavala Nagar Parishad
Lonavala Nagar ParishadPudhari
Published on
Updated on

लोणावळा: शहरातील नागरिक व स्थानिक व्यावसायिकांना रोजगार देण्याकरिता भुशी धरणाची जागा लोणावळा नगर परिषद भाडे तत्त्वावर घेणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाला ४ महिन्यांसाठी २५ लाख रुपये भाडे देण्याचा ठराव लोणावळा नगर परिषदेत मंजूर करण्यात आला आहे.

Lonavala Nagar Parishad
Wadgaon Talegaon Traffic Congestion: वडगाव-तळेगाव महामार्गावरील वाहतूककोंडी कायम; पोलिसांच्या उपाययोजनांना रस्ते विकास महामंडळाचा प्रतिसाद नाही

शहरातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले भुशी धरण हे मध्य रेल्वेच्या मालकीचे आहे. या ठिकाणी मागील काळामध्ये झालेल्या पर्यटकांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करत सर्व दुकाने जमीनदोस्त केली होती. रेल्वेच्या परवानगीशिवाय या ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली होती. या ठिकाणी व्यवसाय करणारे स्थानिक नागरिक हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या ठिकाणी व्यवसाय करून भागवत आहेत.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत घेवडा, शेवगा, ढोबळीची आवक वाढली; भाज्यांचे दर काहीसे नरमले

हे सर्व विक्रेते हे लोणावळा शहरातील नागरिक व मतदार असल्याने त्यांना व्यावसायिक दिलासा देण्याकरिता मध्य रेल्वेच्या मालकीची या ठिकाणी असलेली जागा लोणावळा नगर परिषद पावसाळी हंगामात चार महिने भाडेतत्त्वावर घेणार आहे. या चार महिन्यांकरिता लोणावळा नगर परिषद रेल्वे प्रशासनाला तब्बल २५ लाख रुपये भाडे देणार आहे. स्थानिक व्यावसायिकांवर या ठिकाणी रेल्वेकडून अन्याय होऊ नये, याकरिता ही रक्कम लोणावळा नगर परिषद देणार आहे. तसेच, ही जागा व्यवसाय करण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात आहे. लोणावळा नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Chinchwad Road Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा; अपघातातील ६१ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे

२५ ते ३० स्थानिकांना मिळतोय रोजगार

स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगारासाठी लोणावळा नगर परिषदेने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असले तरी नगर परिषदेने भाडेपट्ट्यापोटी भरलेली ही पुन्हा कशी मिळणार याबाबत मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये या ठिकाणी २५ ते ३० स्थानिक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडून भाड्यापोटी ही रक्कम लोणावळा नगर परिषद वसूल करणार की, या ठिकाणी अजून काही व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार, हे पाहणे गरजेचे आहे. लोणावळा शहरामध्ये भुशी धरण परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडून या ठिकाणी जाण्याकरिता तिकीट आकारले जाणार का?, कशा पद्धतीने नगर परिषद याबाबतचे धोरण ठरविणार व हा चार महिन्यांचा कालावधी कधीपासून कधीपर्यंत असणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Chinchwad Smart City Failure: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा ‘डिजिटल’ कारभार संकटात; ५ हजार सीसीटीव्ही बंद, ११२ कोटींची ई-ऑफिस प्रणाली ठप्प

शहरावर होणार दूरगामी परिणाम

लोणावळा नगर परिषदेच्या मागील सहा ते सात महिन्यांच्या वेगवेगळ्या सर्वसाधारण सभांचा लेखाजोखा लक्षात घेता अनेक विषयांना सभागृहामध्ये विरोध केला जातो व त्यानंतर मात्र हे विषय एकमताने मंजूर होत आहेत. लोणावळा नगर परिषद जे ठराव सभागृहामध्ये मंजूर करत आहेत त्याचा दूरगामी परिणाम शहरावर व नागरिकांवर होत असतो. याकरिता या विषयांवर सखोल चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा याकरिता लोणावळा नगर परिषद भुशी धरणाची जागा भाडेतत्त्वावर घेत आहे, हे उत्तम असले तरी नगर परिषदेचे यामध्ये नुकसान होणार नाही याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. काही नगरसेवकांनी खासगीमध्ये या ठिकाणी आमच्या प्रभागातील नागरिकांनादेखील व्यवसाय करण्याची मुभा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी, असेदेखील म्हटले आहे. त्यामुळे ही जागा भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर त्याचे धोरण नगर परिषद कशा पद्धतीने ठरवणार हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news