Kasarwadi Garbage Issue: कासारवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; पदपथ अन् उद्यानाशेजारील जागा बनल्या डम्पिंग ग्राउंड

मोशी कचरा डेपोनंतर संकलन व्यवस्था कोलमडली; दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Kasarwadi Garbage Issue
Kasarwadi Garbage IssuePudhari
Published on
Updated on

वल्लभनगर: मोशी कचरा डेपो येथील दुर्र पिंपरी-चिंचवड शहराची कचरा व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा मोठा फटका कासारवाडी परिसराला बसला आहे. कासारवाडी–पिंपळे गुरव मार्गावरील पाण्याच्या टाकी समोरील पदपथावर मोठ्या प्रमाणात घरगुती व घनकचऱ्याचे ढिगारे साचल्याने पदपथ अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात अडकला आहे. इतकेच नव्हे, तर उद्यानाशेजारील मोकळ्या जागेतही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने त्या जागेचे अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर झाले आहे.

Kasarwadi Garbage Issue
Pimpri Chinchwad Dangerous DP Box: पिंपरी-चिंचवडमध्ये धोकादायक डीपी बॉक्सचा विळखा; उघड्या वायरिंगमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील अनेक भागांत कचरा संकलन व्यवस्था कोलमडली आहे. घरगुती कचरा उचलण्यासाठी कचरा गाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने पहाटे किंवा मध्यरात्री रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागेत कचरा टाकावा लागत आहे. परिणामी कासारवाडीसह विविध भागांत अनधिकृत कचरा डेपो तयार होत असून, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. दत्तमंदिर उद्यानामुळे या परिसरात नागरिकांची वर्दळ असते. पिंपळे गुरवकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दिवसभर वाहतूक सुरू असते.

Kasarwadi Garbage Issue
Lonavala Bhushi Dam Business: भुशी धरणाची जागा आता लोणावळा नगर परिषदेच्या ताब्यात; स्थानिक व्यावसायिकांसाठी २५ लाखांचे भाडे

मात्र, पदपथावर कचऱ्याचे ढिगारे साचल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरून चालण्याची वेळ आली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे पदपथ व उद्यानाशेजारील साचलेला कचरा तातडीने हटवावा. नियमित कचरा संकलन व्यवस्था पूर्ववत करावी, परिसरात जंतुनाशक व डासप्रतिबंधक फवारणी करावी तसेच अनधिकृतपणे कचरा टाकणाऱ्यांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Kasarwadi Garbage Issue
Wadgaon Talegaon Traffic Congestion: वडगाव-तळेगाव महामार्गावरील वाहतूककोंडी कायम; पोलिसांच्या उपाययोजनांना रस्ते विकास महामंडळाचा प्रतिसाद नाही

शहराच्‍या बकालपणात वाढ

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कचरा कुजून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने डेंग्यू मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच कचऱ्यामुळे शहराच्‍या बकालपणात वाढ झाली आहे.

Kasarwadi Garbage Issue
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत घेवडा, शेवगा, ढोबळीची आवक वाढली; भाज्यांचे दर काहीसे नरमले

मोशी दुर्घटनेनंतर कचरा उचलण्याची व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. पदपथावर कचऱ्याचे ढिगारे असल्याने रस्त्यावरून चालावे लागते. उद्यानाशेजारील मोकळी जागा आता कचराकुंडी बनली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आरोग्य विभागाने तात्काळ उपायोजना करावी.

गणेश जवळकर, सामाजिक कार्यकर्ता, कासारवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news