Pimpri Chinchwad BJP Nominated Corporators: पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी; निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याचा आरोप

सात जणांच्या यादीत पक्षांतर करून आलेल्यांना संधी; इच्छुक कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी सात जणांनी नावे नुकतीच जाहीर केली आहेत. त्यातील सर्वच जण इतर पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. तसेच, भाजपच्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्यात आली नसल्याने पक्षात नाराजीचा सूर आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Water Supply: पिंपरी-चिंचवडकरांची सात वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा; दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट कायम!

सत्ताधारी भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी दीडशे पेक्षा अधिक जण तीव्र इच्छुक होते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड तब्बल साडेआठ महिने लांबणीवर पडली होती. अखेर, रेटा वाढत असल्याने भाजपने सात नावे जाहीर केली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
New Sangvi District Hospital Security: नवी सांगवी जिल्हा रुग्णालयातील पोलिस कक्ष कर्मचाऱ्यांविना; रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

त्यात निष्ठावंत तसेच, हिंदूत्वादी संघटना आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, तसे झाले नाही. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना तसेच, नातेवाईकांची स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. पक्ष निष्ठा कायम ठेवून, तिकीट न मिळताही महापालिका निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही निष्ठावंतांना संधी न मिळाल्याने पक्षात नाराजीचा सूर आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Fire Brigade Masks: पिंपरी-चिंचवड अग्निशमन जवानांसाठी ५० लाखांचे मास्क; एका मास्कची किंमत २५ हजार रुपये!

नागरी समस्या निराकरण करण्यासाठी काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. पक्षाचे प्रामाणिकपणे काम करूनही डावलण्यात आल्याने संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dehu Ghat Construction: देहूतील सिद्धेश्वर मंदिराजवळील घाटाच्या बांधकामावर आक्षेप; १५.६५ कोटींच्या कामामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

बाहेरून आलेल्यांना कोणत्या निष्कर्षात संधी

शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत आहे. आंदोलन व मोर्च काढल्याने माझ्यावर पोलिसात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप पक्षाच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केले आहे. असे असतानाही पक्षाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझ्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले तसेच, नातेवाईकांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे, असा आरोप भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.