Dehu Ghat Construction: देहूतील सिद्धेश्वर मंदिराजवळील घाटाच्या बांधकामावर आक्षेप; १५.६५ कोटींच्या कामामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

बल्लाळाच्या वनाचे अस्तित्व आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत स्थानिकांची चिंता; घाटाच्या आराखड्यात बदल करण्याची मागणी
Dehu Ghat Construction
Dehu Ghat ConstructionPudhari
Published on: 
Updated on: 

देहूगाव: संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून महती वर्णन केलेल्या सिद्धेश्वर मंदिर व बल्लाळाच्या वनालगत पीएमआरडीएकडून घाट विकसित करण्यात येत आहे. मात्र, या घाटाच्या बांधकामातील त्रुटींमुळे वारकरी, भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा घाट धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

Dehu Ghat Construction
Pimpri Chinchwad Unidentified Bodies: पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीची खाकी! बेवारस मृतदेहांना पोलिसांकडून सन्मानाचा अखेरचा निरोप

संत तुकोबांच्या या अभंगानुसार जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराच्या मागील बाजूस सिद्धेश्वराचे पौराणिक मंदिर असून, त्याच्या शेजारी बल्लाळाचे वन आहे. याच पवित्र ठिकाणी पीएमआरडीएच्या वतीने इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर असा घाट विकसित करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे १५ कोटी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, पुण्यातील टी अँड टी इन्फ्रा या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. कामाची मुदत १२ महिने आहे.

Dehu Ghat Construction
Sunetra Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये सुनेत्रा पवार सक्रिय; दर महिन्याला शहरात येऊन विकासकामांचा घेणार आढावा

घाटाचे बांधकाम करताना बल्लाळाच्या वनाला धक्का न लावता त्याचे मूळ अस्तित्व कायम ठेवणे आवश्यक होते. मात्र, या परिसरात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Dehu Ghat Construction
Indrayani Rice Price: इंद्रायणी तांदळाच्या दरात मोठी वाढ; किलोचा भाव ८५ रुपयांवर

आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याबाबत काय निर्णय घेणार, स्थानिक नागरिक व वारकरी-भाविकांच्या मागण्यांची दखल घेणार की त्याकडे दुर्लक्ष करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dehu Ghat Construction
Jambhul Crime: जांभूळ येथील खून प्रकरणात आठ आरोपींना जन्मठेप; मावळ सत्र न्यायालयाचा निकाल

ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात येत आहे, त्याच परिसरातून इंद्रायणी नदी उत्तरेकडे वळण घेते. धार्मिकदृष्ट्या अशा नदीच्या वळणाच्या परिसराला गंगा नदीप्रमाणे पवित्र महत्त्व आहे. असे असताना या ठिकाणी शौचालय बांधणे चुकीचे आहे. शौचालयातील मैलामिश्रित पाणी इंद्रायणी नदीपात्रात मिसळल्यास नदीचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे. त्यामुळे पीएमआरडीएने स्थानिक नागरिकांच्या भावना आणि वारकरी-भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पायऱ्यांच्या बांधकामात आवश्यक बदल करावेत व सुरक्षित पद्धतीने घाटाची निर्मिती करावी.

रायबा मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.