New Sangvi District Hospital Security: नवी सांगवी जिल्हा रुग्णालयातील पोलिस कक्ष कर्मचाऱ्यांविना; रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पंधरा दिवसांत मद्यधुंद तरुणांकडून गोंधळाच्या दोन घटना; डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी
New Sangvi District Hospital Security
New Sangvi District Hospital SecurityPudhari
Published on: 
Updated on: 

सांगवी: रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उपचारांसोबत सुरक्षिततेचीही हमी मिळणे अपेक्षित असते. मात्र, नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेला पोलिस कक्षच सध्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. पोलिस कक्षाची व्यवस्था असली, तरी तेथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होतात. मात्र, अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्ताची गरज आहे.

New Sangvi District Hospital Security
Pimpri Chinchwad Fire Brigade Masks: पिंपरी-चिंचवड अग्निशमन जवानांसाठी ५० लाखांचे मास्क; एका मास्कची किंमत २५ हजार रुपये!

जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. अपघातग्रस्त, मारहाणीत जखमी झालेले रुग्ण, संशयास्पद मृत्यूची प्रकरणे तसेच विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी नागरिकांची सतत वर्दळ असते. बाह्यरुग्ण विभागापासून विविध वॉर्डांपर्यंत रुग्ण आणि नातेवाइकांची गर्दी असते. अशा संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महत्त्वाची असतानाही पोलिस कक्षात नियमित कर्मचारी नसणे ही गंभीर बाब ठरत आहे.

New Sangvi District Hospital Security
Dehu Ghat Construction: देहूतील सिद्धेश्वर मंदिराजवळील घाटाच्या बांधकामावर आक्षेप; १५.६५ कोटींच्या कामामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

रुग्णाची प्रकृती खालावणे, उपचारांना होणारा विलंब, वैद्यकीय प्रक्रियेबाबत निर्माण होणारे गैरसमज किंवा अन्य कारणांमुळे रुग्णालयात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होते. अशावेळी नातेवाईकांचा संयम सुटल्यास डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता असते. काही प्रसंगी हे वाद विकोपाला जाऊ शकतात. अशा परिस्थितीत रुग्णालयातच पोलिस कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस कक्ष असूनही कायमस्वरूपी बंदोबस्त नसल्याने तातडीच्या मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन मद्यधुंद तरुणांचा गोंधळ

​जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांत मद्यधुंद व्यक्तींकडून घडलेल्या दोन गंभीर घटनांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. आधी एका मद्यधुंद तरुणाने रुग्णालयात मोठा धिंगाणा घालत गोंधळ घातला होता. ज्याला आवरताना डॉक्टर, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकांची चांगलीच दमछाक झाली, तर दुसऱ्या घटनेत दारूच्या नशेत अपघात झालेला एक रुग्ण उपचारासाठी आला असता त्याने डॉक्टर, परिचारिकांशी हुज्जत घातली. या सलग प्रकारांमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, येथे तातडीने भक्कम सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, अशी मागणी केली जात आहे.

New Sangvi District Hospital Security
Pimpri Chinchwad Unidentified Bodies: पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीची खाकी! बेवारस मृतदेहांना पोलिसांकडून सन्मानाचा अखेरचा निरोप

वैद्यकीय सेवेवर परिणाम

डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णांचे प्राण वाचविण्याची मोठी जबाबदारी असते. आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वेळेवर निर्णय घेऊन उपचार करावे लागतात. अशावेळी बाहेरील हस्तक्षेप, वादावादी किंवा धमकावण्याचे प्रकार घडल्यास वैद्यकीय सेवेवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः महिला परिचारिका, ज्येष्ठ कर्मचारी आणि रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर आहे.

कायमस्वरूपी बंदोबस्ताचे नियोजन करण्याची मागणी

ग्रामीण भागातूनही अनेक रुग्ण उपचारांसाठी येथे येतात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचीही मोठी संख्या असते. रुग्णालयातील विविध विभागांची माहिती नसल्याने अनेकांना आधीच त्रास सहन करावा लागतो. अशावेळी रुग्णालय परिसरात सुरक्षिततेची भावना असणे गरजेचे आहे. पोलिस कक्ष केवळ नावापुरता न राहता तो प्रत्यक्ष कार्यरत असणे ही काळाची गरज बनली आहे. हे रुग्णालय 24 तास सुरू असते. रात्री-अपरात्रीही गंभीर आणि अपघातग्रस्त रुग्णांना उपचारांसाठी आणले जाते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था केवळ दिवसा मर्यादित ठेवून चालणार नाही. रुग्णालयातील गर्दी, संवेदनशील प्रकरणे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन कायमस्वरूपी बंदोबस्ताचे नियोजन करणे आवश्यक आहे.

New Sangvi District Hospital Security
Sunetra Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये सुनेत्रा पवार सक्रिय; दर महिन्याला शहरात येऊन विकासकामांचा घेणार आढावा

या कक्षात कायमस्वरूपी कर्मचारी नेमले जावेत, यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असल्याने येथे सुव्यवस्था राखण्यासाठी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त असणे अत्यंत गरजेचे आहे.

डॉ. अंबादास देवमाने, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

जिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र अशी राखीव पोलिस चौकी नाही. आमच्या कर्मचाऱ्यांच्या दोन पाळ्यांमध्ये ड्युटी लावली जाते. हे कर्मचारी डेड हाऊसमध्ये काम पाहतात. जवळच्या अंतरावर पोलिस चौकी आणि पोलिस ठाणे उपलब्ध आहे. तसेच, काही अडचण आल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. पोलिस तातडीने मदतीला येतात.

जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.