Pimpri Bhama Askhed Water Project: भामा-आसखेड जलप्रकल्पात विलंब; ठेकेदार बडतर्फ, 84 कोटींची नवी निविदा

उर्वरित 30% कामासाठी दोन ठेकेदार; 9 महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन
Bhama Askhed
Bhama AskhedPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भामा-आसखेड धरणातून 167 पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीसह इतर कामे करण्यात येत आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही जलवाहिनीच्या कामास विलंब केल्याने संबंधित ठेकेदार बडतर्फ केला असून, उर्वरित 30 टक्के कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्या कामाची मुदत 9 महिने असून, त्यासाठी दोन वेगवेगळे ठेकेदार नेमले जाणार आहेत. त्या कामासाठी बडतर्फ ठेकेदाराला संधी देण्यात येणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Bhama Askhed
Dapodi Electricity Issue: दापोडी-फुगेवाडीत जीर्ण विद्युत यंत्रणा धोकादायक; बदलाची मागणी

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून शहरासाठी 167 एमएलडी पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. वारंवार मुदतवाढ आणि सक्त सूचना देऊनही मुंबई येथील ऑफशेर इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड या ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. अद्याप 30 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करून नव्याने अल्प मुदतीची निविदा काढण्यात आली आहे.

Bhama Askhed
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी मंडईत भाजीपाल्याचे दर स्थिर; पालेभाज्यांचे दर वाढले

निविदा 10 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आली आहे. भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर ट्रॅकपर्यंत 1700 मिलीमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे उर्वरित काम करण्यासाठी 33 कोटी 35 लाख रुपये खर्चाची निविदा आहे.

Bhama Askhed
Pimpri Chinchwad Temperature: पिंपरी-चिंचवडमध्ये तापमान 41 अंशांवर; उष्णतेने नागरिक हैराण

तर, ब्रेक प्रेशर ट्रॅकपासून तळवडे व देहूपर्यंतच्या 1400 मिलिमीटर जलवाहिनीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 50 कोटी 69 लाख रुपये खर्चाची निविदा आहे. अशी एकूण 84 कोटी 4 लाख रुपये खर्चाची ही निविदा आहे. ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दोन ठेकेदारांना देण्यात येणार आहेत. काम पूर्ण करण्यासाठी 9 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Bhama Askhed
Pimpri House Theft Arrest: पिंपरीत घरफोडी प्रकरण उघड; महिलेला अटक, सोन्याचे दागिने जप्त

दोन कामांसाठी दोन स्वतंत्र ठेकेदार

उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याला 5 ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. दोन कामासाठी स्वतंत्र दोन ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. पावसाळा धरून कामाची मुदत 9 महिने आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्याचे नियोजन आहे. बडतर्फ केलेल्या ठेकेदाराला निविदा प्रक्रियेत समावेश करण्यात आलेला नाही, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news