Pimpri Chinchwad Temperature: पिंपरी-चिंचवडमध्ये तापमान 41 अंशांवर; उष्णतेने नागरिक हैराण

घाम, डोकेदुखी, सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले; तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचे आवाहन
Temperature
Temperature Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पारा उसळलेलाच होता. शहराचे तापमान रविवार (दि. 26) 41 अंश इतके नोंदविले गेले. रविवार सुट्टीचा दिवस असूनही तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी होती.

Temperature
Pimpri House Theft Arrest: पिंपरीत घरफोडी प्रकरण उघड; महिलेला अटक, सोन्याचे दागिने जप्त

एकंदर वाढत्या तापमानाने शहरवासीयांना घाम फुटत आहे. उन्हामुळे त्वचेची व डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे. थोडावेळ उन्हात थांबले तरी घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे थंड पेय पिण्याचे प्रमाण वाढल्याने सर्दी, खोकला, तापाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

Temperature
Pimpri Chinchwad Anti Drug SOP: पिंपरी-चिंचवडमध्ये अँटी ड्रग मोहीम कडक; शाळा-कॉलेजमध्ये SOP लागू

उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल, टोपी, स्कार्फ, पांढरे कपडे यांचा वापर केला जात आहे. शहरातील बंधाऱ्यांवर देखील पोहणाऱ्यांची गर्दी पहायला मिळत आहे. वाढत्या उन्हाचा प्राण्यांवर देखील परिणाम होताना दिसत आहे. प्राणी घराच्या, इमारतीच्या, झाडांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहे. ओलसर जागेत बसून शरीराला गारवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामानिमित्त घराबाहेर पडताना शक्यतो अंगभर कपडे घालावेत, जेणेकरून उन्हापासून शरीराचे संरक्षण होऊ शकेल. तसेच पाणी भरपूर प्यावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news