Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी मंडईत भाजीपाल्याचे दर स्थिर; पालेभाज्यांचे दर वाढले

वाघाट्या भाजीची आवक सुरू; आवळ्यांना वाढती मागणी
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री मंडईत रविवारी (दि. 26) गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर होते; मात्र पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. बाजारात वाघाट्या भाजीची आवक सुरू झाली आहे. सध्या त्याचा दर 160 रुपये किलो आहे. तसेच, उन्हामुळे आवळ्यांना मागणी वाढली आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Temperature: पिंपरी-चिंचवडमध्ये तापमान 41 अंशांवर; उष्णतेने नागरिक हैराण

कोथिंबीर व मेथीची जुडी 30 रुपये दराने विक्री केली जात आहे. गवार आणि शेवगा आता 50-60 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. वांगी, फ्लॉवरचा दर 40-50 रुपये किलो असा आहे. मिरची 60 रुपये, कर्नाटक कैरी 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदे 100 रुपयांना पाच किलो प्रमाणे विक्री केली जात आहे, तर लसूण 100 - 150 रुपये, आले 60 - 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Pimpri House Theft Arrest: पिंपरीत घरफोडी प्रकरण उघड; महिलेला अटक, सोन्याचे दागिने जप्त

फळभाज्यांचे दर :

रविवारी बाजारात गवार 70 रुपये किलो, शेवगा 40, टोमॅटो 25, भेंडी 50, फ्लॉवर 40, कोबी 30, मिरची 50, गाजर 25, शिमला 60, लसूण 100 - 120, आले 60, वांगी 30, काकडी 30, कारले 70, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30 रुपये किलो, बिन्स 60 रुपये किलो, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70 रुपये, बीट 50, दुधी 40, घेवडा 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Pimpri Chinchwad Anti Drug SOP: पिंपरी-चिंचवडमध्ये अँटी ड्रग मोहीम कडक; शाळा-कॉलेजमध्ये SOP लागू

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रुपये) प्रतिजुडी

कोथिंबीर 30 रुपये, मेथी 30, पालक 20, शेपू 20, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 30, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 10 रुपये जुडी, आंबट चुका 30.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 60 रुपये, गवार 80, वाटाणा 120 - 140, पावटा 70, तोंडली 70, बीट 60, दोडका 60, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 60, मिरची 70, फ्लॉवर 50, कोबी 40 , वांगी 70, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, सुरण 80, मद्रास काकडी 40, आरबी 50, सिमला 80, राजमा 80, बिन्स 70, गाजर 50, रताळी 60, टोमॅटो 30 रुपये, काकडी 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
PCMC 60 Crore Scam: पीसीएमसी 60 कोटी घोटाळा: ‘विभागप्रमुख जबाबदार’; प्रवीण जैन यांचा दावा

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 7, बटाटा 9, लसूण 80, आले 35, भेंडी 25, गवार 45, टोमॅटो 8, वाटाणा 100, घेवडा 35, दोडका 25, हिरवी मिरची 45, दुधी भोपळा 30, काकडी 15, कारली 30, गाजर 30, फ्लॉवर 30, कोबी 25, वांगी 25, बीट 30, शेवगा 30, घोसाळी 30, लिंबू 110, मका कणीस 100 रूपये प्रतिकिलो दर आहेत.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4851, पालेभाजी 47800 (गड्डी), फळे आवक 1618, कांदा 463, बटाटा 543, आले 96, लसूण 15, भेंडी 117, गवार 27, टोमॅटो 514, वाटाणा 7, घेवडा 54, दोडका 22, हिरवी मिरची 198, दुधी भोपळा 50, काकडी 248, कारली 22, डांगर 33, गाजर 94, फ्लॉवर 469, कोबी 224, वांगी 140, ढोबळी 39, बीट 12, शेवगा 89, लिंबू 44, मका कणीस 30, तोंडली 8, रताळी 4 क्विंटल अशी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news