Pimpri Chinchwad Bill Scam: पिंपरी-चिंचवडमध्ये 52 कोटींच्या बिलांचा घोटाळा?; कारवाईची मागणी

बोगस उपसूचनांद्वारे कोट्यवधींचे वाटप; अधिकाऱ्यांवर संगनमताचा आरोप
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: बोगस उपसूचना देऊन तब्बल 52 कोटींपेक्षा अधिक रकमेची बिले परस्पर संबंधित ठेकेदारांना 30 मार्चला दिली गेली आहेत, असा धक्कादायक आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी बुधवारी (दि.8) केला आहे. हा केवळ तांत्रिक घोळ नसून, महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी व ठेकेदारांनी संगनमताने टाकलेला दरोडा आहे. या गंभीर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांचे निलंबन करावे, अशी तक्रारही त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimple Nilakh Traffic Issue: पिंपळे निलखमध्ये वाहतूक कोलमडली; रक्षक चौकात अतिक्रमणांचा विळखा

स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे यांनी सांगितले की, सन 2026-27 चे अधिकृत अर्थसंकल्प मंजूर असताना आणि त्यामध्ये संबंधित कामांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नसतानाही सुमारे 70 हून अधिक कामांची बिले रात्रीतून काढण्यात आली. पाणीपुरवठा, स्थापत्य, बीआरटी या विभागांची तसेच, नाशिक फाटा, मोशी, तळवडे, भोसरी येथील रस्ते कामांची ही बिले आहेत. त्यासंदर्भात संबंधित विभागप्रमुखांना कल्पना देण्यात आली नाही.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Gymnastics Hall Demand: पिंपरी-चिंचवडमध्ये जिम्नॅस्टिक हॉल नाही; खेळाडूंची परवड

प्रवीण जैन यांनी नगरसेवकांची दिशाभूल करत, दोन नगरसेवकांच्या सह्या आणल्या तरच बिल मिळेल, अशी अट घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विविध पक्षांच्या जवळपास 20 नगरसेवकांच्या सह्या घेऊन हा बनाव रचला गेला. ज्या सर्वसाधारण सभेच्या उपसूचनांचा आधार घेऊन ही कोट्यवधींची खैरात करण्यात आली, त्या उपसुचनांवर साधी तारीखही नाही. नगर सचिव विभागांने त्या अधिकृत उपसूचना नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad DBT Scheme Controversy: डीबीटीऐवजी क्यूआर कोडचा घाट; पिंपरी-चिंचवड शिक्षण विभागावर टीका

बारणे म्हणाले की, या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार प्रवीण जैन हेच आहेत. हा केवळ तांत्रिक घोळ नसून, महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी व ठेकेदारांनी संगनमताने टाकलेला थेट दरोडा आहे. त्यामुळे महापालिकेची तिजोरी असुरक्षित झाली आहे. सन 2026-27 वर्षाचे अर्थसंकल्प मंजूर असताना, त्यात कोणतीही तरतूद नसताना 52 कोटीपेक्षा अधिकची बिले वाटलेच कसे जातात. प्रवीण जैन यांनी प्रशासकीय शिस्तीचा भंग केला असून, ते आजच्या स्थायी समितीच्या बैठकीलाही जाणूनबुजून गैरहजर राहिले. आयुक्तांनी त्यांच्या गेल्या 4 वर्षांच्या कामकाजाची झाडाझडती घ्यावी. प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्यांचे तातडीने निलंबन करावे. करदात्या नागरिकांचा पैसा अशा प्रकारे बोगस उपसूचनांच्या नावाने लुटू देणार नाही, असा इशारा बारणे यांनी दिला आहे. आता, आयुक्त या प्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad E Challan Camera Issue: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चलन मशिनचा फज्जा; निकृष्ट कॅमेऱ्यांमुळे कारवाई ठप्प

एका बँकेला कारवाई, दुसऱ्याला अभय

महापालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण असल्याचे भासवणाऱ्या प्रवीण जैन यांनी चक्क बँक ऑफ बडोदामधील मुदत ठेवी काढून घेतल्या. त्याबाबत नियमानुसार प्रक्रिया न राबवता परस्पर त्या मोडून दुसऱ्या बँकेत वळवल्या आहेत. महापालिकेचे कामकाज पूर्वी बँक ऑफ बडोदा बँकेमार्फत सुरू होते. ते बंद करून दुसऱ्या बँकेकडे वळविण्यात आले. त्या बँकेस ठेवी ठेवण्याबाबत बिडींगला आमंत्रित केले गेले नाही. अशा प्रकारे प्रवीण जैन हे मनमर्जी कारभार करत आहेत, असा आरोपही स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केला आहे.

सूचक, अनुमोदकांच्या उपसूचनांवर सह्या असल्याने बिले मंजूर केली

नगरसेवकांनी त्यांच्या त्यांच्या प्रभागातील आवश्यक कामांच्या उपसूचना दिल्या आहेत. त्यावर सूचक व अनुमोदकांच्या सह्या आहेत. तसेच, सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात तरतूद शिल्लक होती. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात तरतूद नव्हती. त्यामुळे नियमानुसार त्या कामांची बिले अदा करण्यात आली. त्या उपसूचना तांत्रिक दृष्ट्‌‍या योग्य आहेत. या प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून कामकाज केले जाते. त्यात नवीन काही नाही, असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news