Sanitation Workers Safety PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेला अनुसूचित जाती आयोगाची नोटीस; सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न

नाल्यांच्या साफसफाईत सुरक्षा साधनांशिवाय काम; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आयुक्तांना आदेश
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याहद्दीतील सफाई कर्मचाऱ्यांकडून आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय नाल्यांच्या साफसफाईची कामे करून घेतली जात असल्याच्या गंभीर तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दखल घेतली असून, महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
PCMC School Reopen: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा १५ जूनपासून सुरू; प्रवेशोत्सवाने होणार स्वागत

नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती व करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने आयुक्तांना दिले आहेत. तसेच, निर्धारित मुदतीत उत्तर प्राप्त न झाल्यास भारतीय संविधानाच्या कलम ३३८ अंतर्गत आयोगास प्रदान करण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक किंवा प्रतिनिधीद्वारे आयोगासमोर हजर राहण्यास समन्स बजावण्यात येऊ शकते, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Weapon License Cancel: पिंपरी-चिंचवडमध्ये 15 शस्त्र परवाने रद्द; 68 अर्ज फेटाळले

प्राप्त तक्रारीनुसार, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांच्या साफसफाईची कामे महापालिकेमार्फत करण्यात येत आहेत. या कामांसाठी यांत्रिक साधनांचा वापर करणे बंधनकारक असतानाही उपलब्ध यंत्रसामग्रीचा पुरेसा वापर न करता मानवी श्रमाचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून न देता धोकादायक परिस्थितीत काम करण्यास भाग पाडले जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Nigdi Chakan Metro: निगडी–चाकण मेट्रो डीपीआर रखडला; मंजुरीअभावी प्रकल्प लांबणीवर

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे हाताने मैला साफसफाई करणाऱ्यांच्या नियोजनास प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिनियम, २०१३ तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ आणि इतर संबंधित कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात ५ मे २०२६ व १० जून २०२६ रोजी समाजमाध्यमांद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Talegaon Temple Theft: तळेगावात देवीचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला; एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य ॲड. सागर चरण यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news