Talegaon Temple Theft: तळेगावात देवीचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला; एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

तुळजाभवानी मंदिरातील नुकताच परत मिळालेला मुकुट लंपास; इंदोरीतील कडजाई माता मंदिराची दानपेटीही फोडली
Talegaon Temple Theft
Talegaon Temple TheftPudhari
Published on
Updated on

रेश्मा फडतरे

तळेगाव दाभाडे: जिजामाता चौक येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील चांदीचा मुकुट पुन्हा एकदा चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Talegaon Temple Theft
School Stationery Shopping: शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग; बाजारपेठ गजबजली

पोलीस पथकाने अथक परिश्रम करून २३ मे रोजी चोरीस गेलेला मुकुट हस्तगत करून आरोपींना जेरबंद केले होते. शुक्रवार (दिनांक १२) रोजी मंदिर व्यवस्थापक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे कन्हैया थोरात यांच्या हस्ते हा मुकुट देवीला परिधान केला होता.

Talegaon Temple Theft
Bhushi Dam Safety Issue: भुशी धरण परिसरात सुरक्षा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

परंतु त्याच रात्री अज्ञात चोरट्याने गाभाऱ्याचा दरवाजा तोडून तो मुकुट पुन्हा चोरी केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस पथकाने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Talegaon Temple Theft
TCS Employee Case: टीसीएस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल

तर दुसऱ्या घटनेत इंदोरी येथील श्री कडजाई माता मंदिरात शुक्रवार (दिनांक १२) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी घुसून गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोकड लंपास केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज वरून चोरांचा माग काढत आहेत. एकाच रात्री घडलेल्या या दोन घटनांमुळे आता देवही सुरक्षित नाहीत ही भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

Talegaon Temple Theft
Pune Metro Feeder Service: पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू

सदर दोनही चोरीच्या घटनांचा पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे. तशा सूचना संबंधित पोलीस पथकांना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक विश्लेषणाद्वारे लवकरच आम्ही या दोन्ही चोरीच्या घटनांचा छडा लावू.

श्वेता खेडकर पोलीस उपायुक्त परिमंडळ 4

logo
Pudhari News
pudhari.news