PCMC School Reopen: पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा १५ जूनपासून सुरू; प्रवेशोत्सवाने होणार स्वागत

विद्यार्थ्यांचे औक्षण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप आणि शाळांमध्ये आनंददायी वातावरणाची तयारी पूर्ण
Schools
SchoolsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: उन्हाळ्याच्या सुटीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवारपासून (दि. १५ ) सुरू होणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Schools
Weapon License Cancel: पिंपरी-चिंचवडमध्ये 15 शस्त्र परवाने रद्द; 68 अर्ज फेटाळले

या वेळी महापौर रवि लांडगे,आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची उत्साहपूर्ण सुरुवात व्हावी यासाठी ते पालकांशी संवाद साधणार आहेत.

Schools
Nigdi Chakan Metro: निगडी–चाकण मेट्रो डीपीआर रखडला; मंजुरीअभावी प्रकल्प लांबणीवर

या प्रवेश उत्सवाद्वारे नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आकर्षक पद्धतीने करण्यात येणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, स्वागत, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन तसेच, शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात येणार आहे.

Schools
Talegaon Temple Theft: तळेगावात देवीचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला; एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

तसेच, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बालभारतीची मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाची सुरुवात तत्काळ होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरू होण्यासाठी शिक्षण विभागामार्फत शाळा पूर्वतयारीची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Schools
School Stationery Shopping: शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग; बाजारपेठ गजबजली

शाळा परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची तयारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सुविधा, डिजिटल शिक्षण साहित्य, शैक्षणिक साधनसामग्री तसेच शिक्षकांची उपस्थिती याबाबत आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news