Weapon License Cancel: पिंपरी-चिंचवडमध्ये 15 शस्त्र परवाने रद्द; 68 अर्ज फेटाळले

गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि नियमभंगावर पोलिसांची धडक कारवाई; परवानाधारकांमध्ये खळबळ
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवाना धारकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. शस्त्रांचा गैरवापर, गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत 15 शस्त्र परवाने रद्द केले आहेत. तसेच, नव्याने शस्त्र परवाना मिळविण्यासाठी आलेले 68 अर्जही फेटाळण्यात आले आहेत.

Gun
Nigdi Chakan Metro: निगडी–चाकण मेट्रो डीपीआर रखडला; मंजुरीअभावी प्रकल्प लांबणीवर

पोलिस आयुक्तांनी शस्त्र परवाना प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही परवानाधारकांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तसेच शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे आढळून आले.

Gun
Talegaon Temple Theft: तळेगावात देवीचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला; एकाच रात्री दोन मंदिरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

त्यामुळे पाच जणांचे परवाने रद्द केले आहेत. याशिवाय परवाना मंजूर झाल्यानंतर नियोजित मुदतीत शस्त्र खरेदी न करणारे तसेच वृद्धत्व किंवा मृत्यू झालेल्या परवानाधारकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी नव्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या 68 जणांची पडताळणी केली असता त्यांना परवाना देण्यासाठी कोणतेही ठोस कारण अथवा पुरेसा आधार नसल्याचे समोर आले आहे.

Gun
School Stationery Shopping: शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग; बाजारपेठ गजबजली

त्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारे कठोर धोरण राबविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news