PCMC Drainage Problem: उघडी गटारे, तुटलेली झाकणे; पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धोका वाढला

प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना; नागरिकांकडून तात्काळ दुरुस्तीची मागणी
PCMC Drainage Problem
PCMC Drainage ProblemPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रस्त्यांवर स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज चेंबर आणि गटारांची झाकणे तुटलेली अथवा उघडी असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

PCMC Drainage Problem
PCMC Water Supply Action: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पीसीएमसीची कारवाई; 23 मोटारपंप जप्त

एखाद्या ठिकाणी खड्डा पडला किंवा झाकण तुटले की त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याऐवजी झाडांच्या फांद्या, मोठे दगड किंवा बॅरिकेड ठेवून केवळ दिखाऊ उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

PCMC Drainage Problem
PCMC City Secretary Appointment: पीसीएमसीच्या नगर सचिवपदी उल्हास जगताप यांची नियुक्ती होण्याची शक्यता

अनेक ठिकाणी वळणावरच उघडी चेंबर्स किंवा तुटलेली झाकणे असल्याने वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ही ठिकाणे लक्षात न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि पादचारी नागरिकांसाठी तर हे जीवघेणे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

PCMC Drainage Problem
PCMC DMS Project: 112 कोटींची पीसीएमसीची ‘पेपरलेस’ प्रणालीच ठप्प; डीएमएसमुळे कामकाजाचा खोळंबा

रस्त्यावर उघडी चेंबर्स, तुटलेली झाकणे आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघात झाल्यास जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

PCMC Drainage Problem
Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद; भाजपकडून विषय पुन्हा तहकूब

काही ठिकाणी दुरुस्ती केली तरी दगड किंवा फांद्या ठेवून धोक्याचा इशारा दिला जातो; मात्र बॅरिगेट्स, रिफ्लेक्ट होणारे रीडिंग लावणे आवश्यक असते. काही ठिकाणी तर दुर्घटना घडू नये म्हणून ठेवलेल्या फांद्यादेखील बाजूला गेल्याने तेथून प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

अदित्य खैरनार, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news