Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद; भाजपकडून विषय पुन्हा तहकूब

महापालिका सभेत गोंधळ, विरोधकांचे आक्रमक आंदोलन; निर्णय पुढे ढकलल्याने राजकीय चर्चेला उधाण
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपाकडून पुन्हा तहकूब करण्यात येत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात घोषणाबाजी केली होती. त्यावर कळस करत सत्ताधाऱ्यांनी तो तहकूब विषय मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेतून वगळा आहे. सत्ताधार्यांच्या या भूमिकेवरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. सत्ताधाऱ्यांकडून कोश्यारी पॅटर्न?, विरोधकांच्या कोंडीसाठी स्वीकृत नगरसेवकांची यादी अडविली असे ठळक वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरून ते वृत्त खरे ठरले आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Kidney Stone Heat Wave Health Risk: सांगवीत उष्णतेचा किडनीवर घातक परिणाम; मूतखडा व संसर्गाच्या रुग्णांत वाढ

एकमत न झाल्याने स्वीकृत नगरसेवकांची सात नावे अद्याप सत्ताधार्यांकडून निश्चित झालेली नाहीत. सत्ताधार्यांनी तो विषय 5 मे रोजीच्या तहकूब सभेत सलग तिसर्यांदा तहकूब केला. त्यावर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसन तीव्र आपेक्ष घेत महापौरांच्या आसनासमोर जमा होत घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीची तीन नावे घोषित करा. सत्ताधार्यांनी आपली सात नावे फुरसतीनुसार घोषित करण्याचा निर्णय घ्यावा, असा खोचक सल्लाही विरोधकांनी दिला.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Dapodi Traffic Jam: दापोडी-फुगेवाडीमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; बेशिस्त पार्किंग आणि बीआरटी कामांमुळे नागरिक त्रस्त

मात्र, सत्ताधारी काही नमले नाहीत. महापौर रवी लांडगे यांनी तो विषय पुन्हा तहकूब करत सभा कामकाज सुरू केले. त्यावर गोंधळ वाढल्याने महापौरांनी सभा 15 मिनिटे तहकूब केली. मे महिन्याची सर्वसाधारण सभा 15 मे रोजी दुपारी दोनला आयोजित केली आहे. त्या सभेची विषयपत्रिका नगर सचिव विभागाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यात स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषयच वगळण्यात आला आहे. नियमानुसार तहकूब झालेला विषय पुढील सभेत घेतला जातो.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Lonavala Maval POCSO Case Review: मावळ POCSO प्रकरण; पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

मात्र, तो विषयच गायब झाल्याने तो विषय दप्तरी दाखल करण्यात आला आहे का, सत्ताधार्यांना स्वीकृत नगरसेवकांची निवडच करायची नाही, असे शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, स्वीकृत नगसेवक निवडीचा विषय मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या सभेच्या विषयपत्रिकेवर होतो. तसेच, 5 मे रोजीच्या तहकूब सभेतही तो विषय होता. वारंवार तो विषय सत्ताधार्यांकडून तहकूब केला जात असल्याचे दिसत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Water Safety Awareness: पिंपरी-चिंचवडमध्ये उन्हाळी सुट्यांदरम्यान जलविहार धोकादायक; पालकांना सतर्कतेचे आवाहन

महापौरांनी तो विषय 15 जूनपर्यंत तहकूब केला आहे

महापौरांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा तहकूब विषय 15 जूनपर्यंत तहकूब केला आहे. त्यामुळे तो विषय मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर नाही. सभागृहात झालेल्या निर्णयाची नगर सचिव विभागाकडून अंमलबजावणी केली जाते, असे महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news